ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेहंदी हा एक नैसर्गिक केसांचा रंग आहे, जो केवळ केसांना रंगच देत नाही, तर त्यांचे पोषणही करतो.
बाजारात उपलब्ध असलेली रासायनिक पदार्थांने भरलेली मेहंदी केसांचे नुकसान करू शकते.
काही लोकांना केसात मेहंदी लावल्याने खाज सुटणे आणि पुरळ येणे यांसारख्या ॲलर्जीच्या रिअॅक्शन येऊ शकतात.
केसांचा ड्रायनेस आणि डॅंड्रफ हे देखील मेहंदीच्या सामान्य साईड इफेक्ट्स मधील एक आहे.
काही प्रकरणांमध्ये, मेहंदीमुळे केसांचा रंग वेगळा होऊ शकतो, ज्यामुळे संपूर्ण दिसण्यावर परिणाम होतो.
मोठ्या प्रमाणात किंवा सतत मेहंदी लावल्याने केस कमजोर होऊ शकतात आणि केस गळण्यास सुरुवात होऊ शकते.
केस निरोगी ठेवण्यासाठी, मेहंदीचा वापर मर्यादित प्रमाणात आणि कमी वेळा करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.