Manasvi Choudhary
जाड नॅचरल आयब्रोज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेक जण नैसर्गिकरित्या दाट आयब्रोज करण्यासाठी घरगुती उपाय करतात.
एरंडेल तेल हे आयब्रोज वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. एरंडेल तेलमध्ये प्रथिने आणि फॅटी ॲसिड्स असतात जे केसांच्या मुळांना पोषण देतात.
नारळ तेल आयुर्वेदिक आहे. त्वचा, केसांसाठी नारळ तेलाचा वापर केला जातो. नारळ तेलामुळे केस मऊ होतात आणि त्यांची गळती थांबते.
कांद्याच्या रसामुळे केसांची वाढ वेगाने होते. आयब्रोजवर कापसाच्या बोळ्याने कांद्याचा रस लावल्यास तुम्हाला फायदा होईल.
तुम्हाला तेलकटपणा आवडत नसेल, तर कोरफड जेल लावा. यामुळे आयब्रोजची वाढ होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते.
व्हिटॅमिन-E ऑईलने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि आयब्रोज दाट होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.