Treaty of Purandar: छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरंदरचा तह काय होता?

Surabhi Jayashree Jagdish

शाहिस्तेखानाचा पराभव

शाहिस्तेखानाचा पराभव आणि सुरतेची लूट यामुळे मुघल प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला होता. म्हणूनच औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग याला प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये पाठवलं. जयसिंगाने किल्ल्यांना वेढे दिले आणि पुरंदर किल्ल्याला वेढा घालून स्वराज्यावर मोठा दबाव निर्माण केला.

पुरंदरचा तह

मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. प्रजेचं नुकसान होऊ नये आणि स्वराज्य टिकून राहावे, यासाठी शिवाजी महाराजांनी मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारला. हा तह इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

पुरंदरचा तह कधी आणि कुठे झाला?

इ.स. १६६५ मध्ये पुरंदर किल्ल्याजवळ हा तह झाला. मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात चर्चा झाली.

तह करण्यामागील मुख्य कारण

मुघल सैन्याने स्वराज्यावर मोठा दबाव टाकला होता. अनेक किल्ले वेढ्यात आले होते आणि प्रजेचे हाल होत होते. पुरंदर किल्ल्याला दिलेल्या वेढ्यानंतर स्वराज्य वाचवण्यासाठी महाराजांनी हा निर्णय घेतला.

किल्ल्यांच्या संदर्भातील अटी

यामध्ये शिवाजी महाराजांना सुमारे २३ किल्ले मुघलांकडे सोपवावे लागले. सुमारे १२ किल्ले महाराजांकडे राहिले. किल्ल्यांचे उत्पन्न आणि प्रदेश निश्चित करण्यात आले.

प्रदेश व उत्पन्नाबाबतची अट

मुघलांना देण्यात आलेल्या किल्ल्यांमधून उत्पन्न मुघलांकडे जाणार होतं. उरलेल्या प्रदेशावर शिवाजी महाराजांची सत्ता कायम राहिली. स्वराज्याचा मूलभूत कणा अबाधित राहिला.

पुरंदरच्या तहाचं ऐतिहासिक महत्त्व

हा तह शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीचं उत्तम उदाहरण मानला जातो. परिस्थितीनुसार माघार घेऊन पुढे मोठा विजय कसा मिळवायचा हे महाराजांनी दाखवलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा