Heart attack symptoms saam tv
वेब स्टोरीज

Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी पायांमध्ये होतात हे 5 मोठे बदल, वेळीच लक्षणं ओळखा

हार्ट अटॅक म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर छातीत दुखणं हे लक्षण येतं. पण हृदयाच्या आजारांचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होऊ शकतो. काही वेळा पायांमध्ये दिसणारी लक्षणं रक्ताभिसरणातील अडचणी किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचे संकेत देऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish
Poor blood circulation

हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं संकेत

आजकाल हृदयाचे आजार अनेक लोकांमध्ये आढळतात. हृदयाचा त्रास झाला की छातीत दुखतंच, असं नाही. काही वेळा हृदयाच्या आजारांशी संबंधित लक्षणं पायांसह शरीराच्या इतर भागांतही दिसू शकतात.

Swollen feet

पायांमधील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

हृदयाशी संबंधित काही आजारांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याचा परिणाम पायांवर दिसू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास पायांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. त्यामुळे पायांमध्ये वेगळी लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Cold feet

चालताना पाय दुखणं

थोडं चालल्यावर पोटऱ्या किंवा पाय दुखत असतील किंवा क्रॅम्प्स येत असतील तर त्यामागे रक्तप्रवाह कमी होण्याचं कारण असू शकतं. काही वेळ आराम केल्यानंतर हा त्रास कमी होत असेल, तर तो पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) या रक्तवाहिन्यांच्या आजाराचं लक्षण असू शकतो.

Numbness in feet

पाय आणि घोट्यांना सूज येणं

पाय किंवा घोट्यांना वारंवार सूज येत असेल, बूट घट्ट वाटत असतील किंवा पाय जड झाल्यासारखे वाटत असतील, तर त्यामागे शरीरात द्रव साचण्याचं कारण असू शकतं. हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरात द्रव साचून पायांना सूज येऊ शकते.

Blood vessel blockage

पाय थंड पडणं

बाहेर उष्णता असतानाही पाय सतत थंड पडत असतील तर त्यामागे रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. पायांकडे रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास पायांना पुरेसं रक्त मिळत नाही आणि ते थंड जाणवू शकतात.

Leg pain while walking

पायांवरील जखम उशिरा भरणं

पायाला झालेली छोटी जखम किंवा खरचटलेली जागा बराच काळ बरी होत नसेल तर त्यामागे रक्तप्रवाह कमी होण्याचं कारण असू शकतं. रक्तप्रवाह कमी झाल्यास जखमेपर्यंत पुरेसा ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक पोहोचण्यात अडचण येऊ शकते.

Nerve damage symptoms

पायांमध्ये मुंग्या येणं

काही लोकांना रात्री पायांमध्ये जळजळ होणं, सुन्नपणा जाणवणं किंवा मुंग्या येण्याचा त्रास होतो. मधुमेह, नसांशी संबंधित समस्या किंवा रक्ताभिसरणातील अडचणी यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे ही लक्षणं दिसू शकतात.

Healthy heart tips

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Bike reserve fuel capacity

Bike reserve fuel capacity: बाईकच्या टाकीत किती पेट्रोल शिल्लक राहिल्यावर रिजर्ववर जाते?

Maharashtra News Live Update : रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Masala French Fries Recipe: लहान मुलांसाठी घरी बनवा कुरकुरीत आणि चटपटीत मसाला फ्रेंच फ्राईज, वाचा रेसिपी

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल, आज स्वस्त झालं की महाग? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवरील गोळीबारामागचा नेमका हेतू काय? आरोपींचा धक्कादायक दावा

Government Scheme : मुलींसाठी राज्य सरकारची ‘कन्या उडान योजना', नेमकं सत्य काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT