Maharashtra News Live Update: मुंबई-ठाण्यात ४६८ झाडांची कत्तल होणार

Marathi Breaking Live Headlines Updates : शिवसेना सुनावणी, पूर्णेकर हत्या प्रकरण,मनोज जरांगे, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग, हवामानाचे अपडेट, अर्णब चक्रीवादळ, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Mumbai : मुंबई-ठाण्यात ४६८ झाडांची कत्तल होणार

मुंबई-ठाण्यात ४६८ झाडांची कत्तल होणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील ८ प्रकल्पांना मंजुरी

महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचा निर्णय; ४६८ झाडे तोडली जाणार

Kalyan : कल्याणपूर्व कोळशेवाडी परिसरात भररस्त्यात महिलेची छेडछाड; अश्लील संभाषण करत बंदूक दाखवल्याचा आरोप!

कोळशेवाडीत संतापजनक घटना

महिलेच्या कुटुंबीयांनी तरुणाला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं

छऱ्याची बंदूक पोलिसांनी जप्त करत आरोपी भरत जाधवला घेतलं ताब्यात

Pune : कोथरूडमधून तांब्याची तार चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक

कोथरूडमधून तांब्याची तार चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक

कोथरूड परिसरातील एका इमारतीमधून तांब्याची तार चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे

कोथरूड पोलिसांनी २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Yavtmal : यवतमाळ जिल्ह्यातील 88 संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक

यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे 88 सहकारी संस्थांच्या निवडणुकींना पुढील आदेशापर्यंत ब्रेक लागला आहे

या संदर्भाचे शासनाचे आदेश यवतमाळ जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडकले आहे सध्या तरी सहकारी संस्था बिनधास्त झाल्या आहेत.

Yavtmal : यवतमाळ जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर चिंतेत ढग

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्री वादळाचा परिणाम यवतमाळ जिल्ह्यात दिसून येत असून गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण निर्माण झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आधीच कापूस सोयाबीन हाताशी गेल्यानंतर आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर चिंतेच ढग निर्माण झाले आहेत

Pune : चिंचवड येथील कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक, एक जण जखमी

चवड येथील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

या आगीत 17 दुचाकी आणि 4 चारचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.

या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pune : पुणे शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा सत्कार

पुणे शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा सत्कार.

कौस्तुभ गावडे यांनी पुणे विभाग शिक्षक मतदार संघात मिळवला विजय..

महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि शिवसेना पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार होते रिंगणात

कौस्तुभ गावडे यांचा पुणे शहर कार्यालयात शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आमदारपदी निवड झाल्यानंतर केला सत्कार..

भाजपने शिक्षक आमदार जागा आणली खेचून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com