
अनेक लोक त्यांच्या सुट्ट्यांमध्ये परदेशी प्रवासाला जातात आणि तिथून आठवणी घेऊन परत येतात. अशाच एका मुलीने तिच्या बालीच्या प्रवासातील एक भयंकर अनुभव शेअर केला आहे. ती समुद्राच्या प्राणघातक लाटांमधून कशी वाचली याचा तपशील सांगत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत तिने समुद्राच्या उंच आणि वेगवान लाटा तिच्यावर कशा धडकत आहेत हे दाखवणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये केटी एका दगडावर उभी राहून सेल्फी घेत होती, तिचे केस वाऱ्यात उडत होते. अचानक एक प्रचंड मोठी लाट आली, तिने तोल गमावला, कॅमेरा थेट समुद्रात गेला आणि व्हिडिओत फक्त पाणी, किंकाळ्या आणि गोंधळच उरला. नंतर केटीने मजेत लिहिले, असं वाटलं, जसं समुद्रानेच मला फोन केला असावा.
ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर केटी जॉन्सनने बालीतील नुसा पेनिडा बेटावर सेल्फी घेत असताना भयंकर समुद्री लाटांचा सामना केला. निळ्या समुद्राची आणि खडकांची सुंदरता हे पर्यटकांना आकर्षित करते, पण या व्हिडिओमुळे भरती-ओहोटीचा पूल आता व्हायरल झाला आहे. केटीच्या धाडसी सेल्फीमुळे समुद्राच्या ताकदीचे धक्के समजले जात आहेत आणि तिचा हा अनुभव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला आला आहे.
इन्स्टा पोस्टमध्ये केटीने लिहिले की ती फक्त ईस्टरची मजा लुटत होती, पण समुद्राने तिला 'साहसाचा डोस' द्यायचं ठरवलं. लाट जणू सूड घेण्यासाठीच आली! असं तिनं मजेत म्हटलं. केटी बचावली, पण कॅमेरा मात्र समुद्रात गेला. आता तो कदाचित माशांसोबत 'पाण्याखालील व्लॉग' शूट करत असेल, असंही तिने लिहून गंमत केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.