
Family Dance Video: सासू- सुनेचं नातं म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कडाक्याच भांडण.अनेकदा या नात्यात खटके उडतात तर अनेकदा जोरदार भांडणही होतात.सोशल मीडियावर बऱ्याच या नात्याबद्दले अनेक गमतीदार किस्से दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा अनोखा आहे,ज्यात चक्क सासू-सुनेचा तुम्हाला धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत आहे.
सोशल मीडियावर कायम अनेक डान्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी चिमुकल्यांचे व्हिडिओ असतात तर कधी लग्नातील नवरा-बायकोचा डान्स(Dance) असतो.मात्र सध्या व्हायरल होत असलेला सासू-सुनेचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घरात सासू-सुन दिसत असून त्या काखेत कळसा गावाला वळसा या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतात.व्हिडिओत तुम्हाला आजींनी आणि सुनेने मस्त साडी नेसलेली आहे.डान्स करताना दोघींच्या चेहऱ्यावर मस्त आनंद दिसून येत आहे.मात्र काही वेळात त्यांच्या सोबत डान्स करण्यासाठी एक आजोबा येतात आणि आजोबाही मस्त उत्साहात डान्स करताना दिसत आहे.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
nakti_family0803या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ(Video) अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात पंसतीस आलेला असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''एवढं नाचत असताना हे पदर पडू दिला नाही खाली यालाच म्हणतात संस्कृती आजी'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''आजींनी खूप सुंदर डान्स केला'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.