Viral Video: बापरे...! धावत्या लोकलच्या दरवाज्यात जबर हाणामारी, एकमेकांचा गळा पकडून दे दणा दण; VIDEO व्हायरल

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांंमध्ये संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. नक्की काय घडले ट्रेनमध्ये एकदा पहा.
Mumbai Local Train
Viral VideoSaam Tv
Published On

Fighting Video: सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यापासून मुंबई लोकलचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात,ज्या व्हिडिओत धावत्या रेल्वेत तर रेल्वेस्थानकावर विविध गोष्टी घडतात. बऱ्याचदा तर काही तरुण धावत्या ट्रेनच्या दरवाजात लटकून धोकादायक स्टंट करतात आणि ट्रेनमधील काही प्रवासी सीटवरुन वादविवाद करताना दिसून येतात. सध्या पुन्हा एकदा सोशल मीडिया असंच काहीस पाहण्यास मिळत आहे,ज्यात मुंबई लोकलमध्ये चक्क दोन पुरुषांमध्ये पहिल्यांदा वाद झाला मग ट्रेनच्या दारातच हाणामारी सुरु झाली.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला ट्रेनमध्ये अनेक पुरुष प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. बरेच प्रवासी हे ट्रेनच्या दरवाजात लटकून प्रवास करत आहे तर काही दरवाजाच्या जवळ उभे आहेत. मात्र काही वेळात दरवाजाच्या जवळ असलेल्या दोन व्यक्तींमध्ये जोरदार वाद होण्यास सुरुवात होते. पाहता पाहता हे वाद येवढ्या टोकाला जातात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा गळा आवळतो. ट्रेनच्या आतील प्रवासी(Passenger) दरवाज्याजवळ असलेल्या व्यक्तीला आत येण्यास आवाज देत होते. त्या व्यक्तीचा तोल गेला असता तर खाली पडलाही असता.संपूर्ण धक्कादायक प्रकार ट्रेनमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

ट्रेनमधील हाणामारीचा संपूर्ण व्हिडिओ सध्या एका दिवसापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे त्यातही तो व्हिडिओ ''chalo.virar'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हायरल होत असलेली घटना विरार-चर्चगेट लोकलमधील असल्याचे समजते. सोशल मीडियावर यापूर्वीही या लोकल प्रवासादरम्याने हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''रोजच्या गोष्टी आहेत या'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''हे रोज घडते, आता मला ते पाहण्याची उत्सुकताही वाटत नाही'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''असं करू नकोस कोणीतरी पडू शकते किंवा काहीतरी घडू शकते'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mumbai Local Train
Viral Video: 'माझ्या मांडीवर येऊन बस...' दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com