Kumbh Mela Special Train: पुणेकरांनो कुंभमेळ्याला जायचंय? भारत गौरव विशेष ट्रेन धावणार; वाचा वेळापत्रक

Maha Kumbh Mela 2025: पुणेकरांना कुंभमेळ्याला जाणं सोपं होणार आहे. पुण्यातून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष ट्रेन धावणार आहे. या ट्रेनच्या वेळापत्रकाविषयी घ्या जाणून...
Special Train for Kumbh Mela 2025
Kumbh Mela Special TrainSaam Tv
Published On

पुण्यामध्ये राहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणेकरांना थेट पुण्यातून प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाता येणार आहे. कारण कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष ट्रेन धावणार आहे. कुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या 'आयआरसीटीसी'मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांना कुंभमेळ्याला जाणं सोपं होणार आहे. त्यासाठी ही ट्रेन कधी आणि कुठून सुटणार आहे याबाबतची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१५ जानेवारीच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही विशेष ट्रेन पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सुटेल, अशी माहिती 'आयआरसीटीसी'चे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली. केंद्र शासनाच्या 'देखो अपना देश' या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या धावल्या आहेत.

Special Train for Kumbh Mela 2025
Simhastha Kumbh Mela Nashik: सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये, ७५०० कोटींचा आराखडा; पंचवटीत रामायण काळ झर्रकन नजरसमोर येणार!

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये यंदा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा होणार आहे. तब्बल ४४ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात फक्त देशातीलच नाही तर परदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी होत असतात. यंदा देखील मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे.

या कुंभमेळ्यासाठी स्थानिक प्रशासनासोबतच रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यभरातील नागरिकांना कुंभमेळ्यामध्ये सहभागी होता यावे यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी भारत गौरव रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीने पुण्यातून प्रयागराजला जाण्यासाठी एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. भारत गौरव असे या रेल्वेचं नाव असून ही ट्रेन १५ जानेवारीला पुण्यावरून प्रयागराजला जाणार आहे.

Special Train for Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यासाठी ई-पास कसा मिळवाल? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पुण्यावरून प्रयागराजला जाणारी भारत गौरव ही विशेष ट्रेन १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. केंद्र शासनाच्या 'देखो अपना देश' या योजनेअंतर्गत भारत गौरव ही विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचसोबत प्रयागराजला जाण्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराज छिवकीमार्गे चालविण्यात येणार आहेत.

Special Train for Kumbh Mela 2025
Kumbh Mela 2025 : महाकुंभमेळ्याबद्दल 'ही' रंजक रहस्ये तुम्हाला माहिती आहेत का? एकदा वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com