

लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करतात. प्रवासादरम्यान मुंबईकरांना या लोकल ट्रेनच्या गर्दीचाही सामना करावा लागतो. अशातच सोशल मीडियावर अनेकदा प्रवाशांचा रिस्की प्रवासही आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, रेल्वेच्या डब्याचा दरवाजा बंद असतानाही काही लोक दरवाजावर लटकून प्रवास करताना दिसतायत. दरवाजा बंद असून देखील वरच्या बाजूला पकडून मुंबईकर प्रवास करत असल्याचं पाहायला मिळतंय. जीव धोक्यात घालून केलेली ही कृती पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान हा व्हिडिओ कोणत्या स्टेशनजवळचा आहे, याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र मुंबई रेल्वे स्टेशनवरील अशा घटना नवीन नाहीत. रोजच्या धावपळीत वेळ वाचवण्यासाठी किंवा ऑफिसला उशीर होत असल्याने अनेक प्रवासी शॉर्टकटचा मार्ग निवडतात. मात्र हा ‘शॉर्टकट’ त्यांच्या जीवावर बेतू शकतो.
सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. अनेकांनी या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत 'थोड्या वेळासाठी जीव धोक्यात घालणं योग्य नाही' असं मत व्यक्त केलंय. काहींनी अशा लोकांवर अधिक कडक कारवाई करावी अशी मागणीही केलीये. 'अशा लोकांमुळे इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येतो' अशीही प्रतिक्रिया एका यूजरने दिलीये.
या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वेळ वाचवण्याच्या नादात जीव धोक्यात घालणं किती घातक ठरू शकते, याची जाणीव सर्वांनी ठेवणं आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.