Melanistic Leopard: काळा बिबट्या कधी पाहिला का? VIDEO होतोय व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर सध्या ओडीशामधील एका जंगलामधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून सध्या मोठ्या संख्येने चर्चेचा विषय बनला आहे.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

Odisha Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्राण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल होत असलेले व्हिडिओ वन्यजीव प्रेमींच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस येत असतात. त्यात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ओडीशामधील एका जंगलात दुर्मिळ मेलेनिस्टिक बिबट्या दिसून आलेला आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ओडिशामधील एका जंगलातील आहे. व्हिडिओत तुम्हाला सर्वत्र जंगलाचा परिसर दिसत असून त्यात जंगलाच्या एका दिशेने बिबट्या चालत येताना दिसत आहे. तुम्ही पाहिले तर बिबट्याचा रंग चक्क काळा आहे. या बिबट्याला काही ठिकाणी ''ब्लॅक पँथर'' तर काही ठिकाणी ''मेलेनिस्टिक बिबट्या'',असे म्हणतात. व्हिडिओत दिसणारा बिबट्याची प्रजाती ही दुर्मिळ असल्याने सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहिला जात आहे.

व्हिडिओ कुठे पाहता येईल?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पाहता येत असून तो नेटकऱ्यांना ''@ANI'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. ३ जानेवारी रोजी ANI व्हायरल होताच नेटकरी वर्गात कुतुहलाचा विषय ठरत आहे. पहिल्यांदा असा बिबट्या पाहिल्यानंतर व्हिडिओच व्ह्यूज मोठ्या संख्येने वाढत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओतील बिबट्याचे रुप पाहून नेटकरी भारावून गेले आहे मात्र त्यातील काही नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कुठे आढळून आलेला आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'' तर ''पहिल्यांदा पाहिले असं'', अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Viral Video: काय वेळ आली... दारासमोर ठेवलेल्या क्रॉक्सवर हात केला साफ, CCTV व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com