Shocking Video: जणू दुर्गाच अवतरली! २ चोरांना एकटीच भिडली, पालघरमधील तरुणीने त्यांना जन्माची अद्दल घडवली

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या पालघरमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच या घटनेतील तरुणीचे खुप कौतुक होत आहे. असे नेमके काय घडले असे ते पाहा.
Girl Catches Thief palghar
Shocking VideoSaam Tv
Published On

Girl Catches Thief: पालघर जिल्ह्यातील आदर्श नगर परिसरात एका धाडसी तरुणीच्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी उघडकीस आली. घरफोडी करून सुमारे १० ते ११ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पळ काढत असलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाला तरुणीने पकडलं आणि दुसरा चोरटा मात्र अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर तुफान होत आहे.

पालघरच्या आदर्श नगर वसंत विला येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी (Thief) घरात कोणी नसताना लॉक तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घरात त्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याने त्यांनी समोरच्या घरात घरफोडी केली.

या घरातून त्यांनी आठ ते दहा लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. मात्र, पळून जाताना घरातील तरुणी कल्पना चव्हाण ही बाजारातून परतली. यावेळी या चोरट्यांमध्ये आणि तरुणीमध्ये झटापट झाली असून एका चोरट्याला पकडून ठेवण्यात या तरुणीला यश आलं. चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत तरुणी कल्पना चव्हाण ही जखमी झाली असली तरी देखील तिने या चोरट्याला पकडून ठेवलं यानंतर आरडाओरड केल्याने स्थानिक आणि घटनास्थळी धाव घेत या चोरट्याला पकडून बेदम चोप दिला

यानंतर या चोरट्याला पालघर पोलिसांच्या (Police) हवाली करण्यात आला असून, दुसरा चोरटा मात्र आठ ते दहा लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. झटापटीत जखमी झालेल्या तरुणी कल्पना चव्हाण हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिने दाखवलेल्या धाडसाच सध्या सर्वत्र कौतुक होते

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Girl Catches Thief palghar
Shocking Video: दुचाकीचा कट मारल्याच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com