Viral Video: चिप्सप्रमाणे झुरळ खाणारा तरुण पाहिला का? VIDEO पाहून नेटकरी झाले हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियावर अनेक फुड ब्लॉग व्हिडिओ व्हायरल होत असतात.सध्या पुन्हा एकदा एका तरुणाचा फुड ब्लॉग व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,मात्र त्याने चक्क त्यात झुरळ खाल्ले आहे.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Food Viral Video: भारतातील खाद्य संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे.भारतात येणारा प्रत्येक पर्यटक भारतातील प्रत्येक पदार्थ खावून पाहतो.मग भारतातील नागरिक जेव्हा बाहेरील देशात जातात तेव्हा तेथील पदार्थ टेस्ट करतात,मग काय अनेकदा बाहेरील देशात मिळणारे कीटक ही खातात जे त्या देशात खाल्ले जातात,सध्या सोशल मीडियावर अशाच एका बाहेरील देशातील व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात त्याने चक्क झुरळ खाल्ले आहे आण ते खातानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे.

तुम्हाला माहितीच असेल बाहेरील काही देशात झुरळ खाणं अत्यंत साधारण गोष्ट आहे.ऐवढेच नाही तर उंदीर अन् काही प्राणी खाल्ले जातात.त्यातच सध्या व्हायरल होत असलेला व्हायरल होत आहे ज्यात चक्क एक तरुण कुरकुरीत चिप्सप्रमाणे झुरळ खात आहे.व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवा,तुम्ही हे कधी खाणार का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुरुवातीस एक तरुण आहे.जो पैसे देऊन एका मशिनमधून एक बॉक्स काढतो.मग काय तो बॉक्स घरी घेऊन जातो आणि फूड ब्लॉग बनवण्यास सुरुवात करतो.तरुण तो घेऊन आलेल्या बॉक्समधून एक पाकिट काढतो आणि मग ते पाकीट काढल्यानंतर ते उघडतो,त्या पाकिटातून तो तरुण चक्क झुरळ काढतो आणि एक एक खाण्यास सुरुवात करतो.तो झुरळ असे खात आहे की चिप्स खात आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांमध्ये पाहिला जात आहे.

तरुणाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील ''hungryoc'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हायरल(Viral) व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही,मात्र कमेटबॉक्समध्ये नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''भावा भारतात जा तुला फ्रीमध्ये भेटतील'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''बाई काय हा प्रकार'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Video: दुचाकीला कट का मारला? दोघांनी तरुणाला बेदम चोपलं,सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com