Viral Video: काय सांगता? नवी मुंबईमध्ये दिसला सोनेरी कोल्हा; VIDEO होतोय व्हायरल

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर नवी मुंबईमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,मात्र सध्या व्हायरल व्हिडिओ काहीसा खास आहे,ज्यात नवी मुंबईमध्ये चक्क सोनेरी कोल्हा वावरताना दिसून आलाय.
Fox Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Fox Viral Video: लबाड कोल्ह्याची गोष्ट आपण सर्वांनी लहानपणी ऐकली आहे,असा हा लबाड सोनेरी कोल्हा नवी मुंबईत कुत्र्यांसोबत वावरताना दिसलाय.यापासून काय धोका आहे आणि मुळात त्याला आपला मूळ अधिवास सोडून का बाहेर यावे लागत आहे.

मुंबई आणि नवी मुंबई(Navi Mumbai) परिसरात भटके कुत्रे दिसणे यात काहीही नवीन नाही,मात्र याच भटक्या कुत्र्यांसोबत सोनेरी कोल्हा वावरताना दिसून आलाय.दरम्यान सोनेरी कोल्हा दिसायलाही अगदी कुत्र्यासारखाच असल्याने हा नक्की कुत्रा आहे की कोल्हा हे ओळखणंही अगदी कठीण झालंय.

नवी मुंबईतील खारघर इथे सोनेरी कोल्हे आणि कुत्रे एकत्र वावरताना दिसून आलेत आणि त्याचमुळे आता या सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आणि संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.दरम्यान काही दिवसांपूर्वीच तीन सोनेरी कोल्ह्यांचे मृतदेह सापडले होते आणि महत्त्वाचे म्हणजे या तीनही कोल्ह्यांना रेबीजची लागण झाली होती. त्यामुळेच आता सोनेरी कोल्हे आणि कुत्रे यांचा एकत्र वावर हा मानवासाठी आणि त्या दोन्ही प्रजातींसाठीही अत्यंत धोकादायक ठरू शकतो.

दरम्यान, सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्रित येणे ही धोक्याची घंटा आहे,कारण त्यांच्या संकरातून नवी प्रजाती जन्माला येण्याचा धोका असून तसे झाल्यास ते सर्वांसाठीच घातक ठरू शकते.सरकारकडून आजपर्यंत सोनेरी कोल्ह्यांचे ना सर्वेक्षण ना त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्यात,त्यामुळे या संदर्भात दखल घेऊन लवकर उपायोजना करणे आता महत्त्वाचे ठरतेय.दरम्यान यावर नक्की काय उपाय करता येऊ शकतो तेही पाहुयात

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कांदळवनांचा ऱ्हास सुरुये...

अर्थातच सोनेरी कोल्ह्यांची वाढती संख्या ही कांदळवनांची जैवविविधता योग्य प्रकारे संवर्धित होत नसल्याचे द्योतक आहे.दरम्यान ही कांदळवनं सध्या सिडकोच्या अधिकार क्षेत्रात असून त्यांचे हस्तांतरण वनविभागाकडे करावे.ही मागणी अजूनही कायम आहे,त्यामुळे वन विभाग इथे कारवाई करू शकत नाहीये आता सरकारने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Fox Viral Video
Vinod Kambli Viral Video: तेरे बिना भी क्या जीना.. डोळ्याला गॉगल अन् पत्नीचा हात धरत विनोद कांबळींची वानखेडेवर एन्ट्री - VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com