Viral Video: पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनोखा जुगाड! दुचाकी चालवली तरी कशी? व्हिडिओतून मिळणार उत्तर

Viral News: देशात सध्या पेट्रोलचे भाव खूप वाढले आहे. पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच एका दुचाकीस्वाराने चक्क गोबरगॅसचा वापर करुन दुचाकी चालवली आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Jugaad Viral Video:

देशात सध्या पेट्रोलचे भाव खूप वाढले आहे. पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच एका दुचाकीस्वाराने चक्क गोबरगॅसचा वापर करुन दुचाकी चालवली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकजण सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. परंतु एका तरुणाने चक्क गोबरगॅसचा वापर करुन दुचाकी चालवली आहे. फेसबुकवर याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने बाईकला प्लॅस्टिकची बाटली बांधली आहे. त्या बॉटलमध्ये शेण भरले आहे. त्या बॉलला एक पाईप लावला आहे. त्यातून निघणाऱ्या गोबरगॅसने तरुण बाईक चालवली आहे. या भन्नाट आयडियाला पाहून गावातील इतर लोकांनीही हा जुगाड केला आहे.

या व्हिडिओत ती व्यक्ती गोबर गॅस कसा बनवतात हे सांगताना दिसत आहे. तो एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये शेण भरुन महिनाभर ठेवत होता. त्यानंतर शेणाचे रुपांतर गोबरगॅसमध्ये होते. त्याचाच वापर त्याने बाईक चालवण्यासाठी केला आहे. यामुळे पेट्रोलचा खर्च वाचतो, असे त्याचे म्हणणे आहे.

Viral Video
Viral News: घरात सापडलेल्या लिंबाने नशिबच चमकलं; खास लिंबाचा लाखो रुपयांना लिलाव

फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पैसे वाचवण्यासाठी अनोखी शक्कल, हा जुगाड करायलाच हवा, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Viral Video
CCTV Footage: कल्याणमध्ये एसटीबसनं ४ ते ५ दुचाकींना चिरडलं; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com