अभिजित देशमुख, कल्याण
कल्याणमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. कल्याण लालचौकी परिसरात एसटी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झालाय. अपघातात एसटीने ४ ते ५ वाहनांंना धडक दिली आहे. या घटनेत एक जण जखमी झालाय.
राज्य परिवहन मंडळाची एसटी बस आणि दुचाक्यांच्या अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. अपघात झाला तेव्हा या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघात होताच उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी जखमींच्या दिशेने धाव घेतली. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून पाहाणी केली आहे. या प्रकरणी एसटी चालकाचीही चौकशी करण्यात आली. यावेळी एसटी चालकाला बीपीचा त्रास झाल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सदर अपघाताचा थरार रस्त्यावर असलेल्या दुकानातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये बस वेगात येताना दिसत असून रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच वाहनांना उडवलं आणि चिरडलं आहे. यामध्ये ४ दुचाक्यांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.