Fight Viral Video: दिल्लीच्या मॉलमध्ये दोन तरुण भिडले; लाथा-बुक्क्यांनी हाणामारी; VIDEO VIRAL

Delhi Mall Fight Video: दिल्लीत एका मॉलमध्ये दोन तरुणांमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. मॉलमध्ये दोन तरुणांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Fight Viral Video
Fight Viral VideoSaam Tv
Published On

सध्याच्या काळात शॉपिंग हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. सर्वांनाच शॉपिंग करायला आवडते. शॉपिंग करण्यासाठी लोक स्ट्रीट शॉपिंग किंवा मॉलमध्ये जातात. मॉलमध्ये शॉपिंगसाठी नेहमी गर्दी असते. मॉलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मॉलमधील हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नोएडातील एका मॉलमध्ये तरुणांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. मॉलमध्ये दोघांमध्ये मारामारी झाली. या वादात आजूबाजूचे अनेक लोकदेखील सहभागी झाले. त्यांच्यामध्ये मारामारी होताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत सुरुवातील एका व्यक्तीला जमिनीवर पाडून मारताना दिसत आहे. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी एकाला मारताना दिसत आहे. बाजूला उपस्थिक असलेले लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु बे दोघेही एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहे. दिल्लीतील मॉलमधील मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये हा प्रकार घडला आहे. या मॉलमध्ये तरुणांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Fight Viral Video
Rashtrapati Bhavan Leopard Viral Video: राष्ट्रपती भवनात दिसलेल्या त्या प्राण्याचं रहस्य आलं समोर; दिल्ली पोलिसांनी उकललं गुढ

suman pakad या एक्स प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 'दारु पिऊन हाणामारी करण्यासाठी मॉल नाही', 'मॉलमध्येच जर अशी मारामारी व्हायला लागली तर खूप वाईट परिस्थिती आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Fight Viral Video
Viral Video : पेट्रोल भरताना फोन वाजला, उचलताच आगीचा भडका उडाला; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com