Young Boy Selling Vadapav: सध्या सोशल मीडियावर आपल्याला अनेक तरुणाईचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. त्यातील अनेक व्हिडिओ हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर करत असतात. त्याचे दररोज येणारे व्हिडिओ पाहणे नेटकऱ्यांना आवडत असतात. सध्या अशाच एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. ज्यात त्याने एक दिवस वडापावचा व्यवसाय करुन पाहिला ज्यात त्याने दिवसाला मोठी रक्कम कमवली आहे. सध्या या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक तरुण आहे. ज्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला असून डोक्यावर पांढरी टोपी घातलेली आहे. त्यानंतर तो एका वडापाव विकण्यासाठी तयार होतो. काही वेळात तो दिवसभर वडापाव विकतो. त्यामध्ये सातत्याने येणाऱ्या नागरिकांना वडापाव विकण्यात त्याची धावपळ होते ते दिसून येत आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने ६२२ वडापाव विकल्याचे सांगितले आहे. आणि ते वडापाव (Vada pav)विकून त्याने दिवसाच्या शेवटी तब्बल ९,३०० रुपये कमावले असल्याचे वडापावचा स्टॉल असलेल्या मालकाला सांगितले. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''@sarthaksachdevva'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. तरुणाचा व्हिडिओ साधारण पाच दिवसांपूर्वी व्हायरल होताच तब्बल २ लाखाहून अधिक नेटकऱ्यांच्या व्हिडिओ पसंतील आलेला असून व्हिडिओला अजूनही मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे शिवाय व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये''बडी बडी बाते वडापाव खाते'' असे लिहिण्यात आलेले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसणारा तरुणाचे याच अकाउंटर असंख्य व्हिडिओज आहेत शिवाय हा तरुण एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तरुणाने केलेल्या हटक्या अनुभावाची आयडिया नेटकऱ्यांना प्रचंड आवडलेली आहे. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भारताची शिक्षण व्यवस्था यशस्वीपणे भाजून घेतली'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आजपासून अभ्यास करणं बंद'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.