Train Viral Video
Train Viral VideoSaam Digital

Viral Video: वाह रे दीदी वाह! भरगर्दीत ट्रेनमध्ये चढण्याची 'निन्जा टेक्निक', पाहा VIDEO

Train Viral Video: रेल्वे आणि गर्दी यांचं एक वेगळंच नातं आहेत. कारण अनेक मार्गांवरील ट्रेन्सना असणारीही गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो.
Published on

Ujjain Station Viral Video

रेल्वे आणि गर्दी यांचं एक वेगळंच नातं आहेत. कारण अनेक मार्गांवरील ट्रेन्सना असणारीही गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो. या गर्दीतून मार्ग काढून ट्रेनमध्ये चढण्यासाठी नागरिक विविध मार्गांचा अवलंब करतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Train Viral Video
Viral Video: कंटेनरच्या बाजूला उभं राहणं बेतलं जीवावर ;घटनेचे थरारक CCTV फुटेज आले समोर

अनेकदा काही प्रवाशांना कर्फम टिकीट असूनही ट्रेनमध्ये चढता येत नाही. सध्या सोशल मीडिया अॅप एक्सवर (twitter) रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिला ट्रेनमध्ये चढण्यासाठी आपत्कालीन खिडकीचा वापर करत आहेत

व्हायरल व्हिडिओ उज्जैन स्टेशनचा आहे. स्टेशनवरील प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर येण्याची वाट पाहत आहेत. काही वेळानंतर रेल्वे येते. स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे प्रवाशी रेल्वेच्या प्लॅटर्फामवरुनही आणि दुसऱ्या बाजूने चढत आहेत. प्लॅटर्फामवरील काही प्रवाशांना गर्दी असल्यामुळे ट्रेनमध्ये चढता येत नाही.

परंतु काही महिला रेल्वेच्या आपत्काळीन खिडकीतून आत जाताना दिसत आहेत. सुरुवातीला एक तरुणी आत जाते, त्यानंतर दुसरी महिला तिला बॅग देताना दिसत आहे. त्यानंतर दुसरी महिला देखील आत जाते. या दोघी आत जाईपर्यंत इतर प्रवासी दरवाज्यातून आत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. एक्स(twitter)@Cow__Momma या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

याआधीही आपण अशाच भरगर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कधी या गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव देखील गमावावा लागतो.

Train Viral Video
Viral Video: मस्ती पडली महागात! माकडांनी तरुणांना बेदम लाथा मारत पळवून लावलं, पहा फनी VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com