Viral Video: मस्ती पडली महागात! माकडांनी तरुणांना बेदम लाथा मारत पळवून लावलं, पहा फनी VIDEO

Animal Viral Video: व्हायरल व्हिडिओ म्हटलं की अनेक विविध प्रकारच्या व्हिडिओचाचं खजिना असतो. हे व्हिडिओ कधी गमतीदार असतात तर कधी काळजाचा थरकाप उडणारे असतात.
Animal Viral Video
Animal Viral VideoSaam Digital
Published On

Monkey Viral Video

व्हायरल व्हिडिओ म्हटलं की अनेक विविध प्रकारच्या व्हिडिओचाचं खजिना असतो. हे व्हिडिओ कधी गमतीदार असतात तर कधी काळजाचा थरकाप उडणारे असतात. कधी प्राण्यांच्या मस्तीचे व्हिडिओ असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओतून माणुसकीचे दर्शन घडते तर कधी क्षुल्लक कारणांवरुन हाणामारीही होताना आपण पाहिली आहे. परंतु सध्या सोशल मीडिया एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, व्हिडिओत माकडांचा तरुणावर हल्ला होताना दिसत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एका मोकळ्या मैदानात काही तरुण आहेत तर अजून काही माकड दिसत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की वैतागलेल्या माकडांनी तरुणांवर हल्ला केलाय. माकडांपासून वाचण्यासाठी तरुण पळण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओत एक पाढंऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुण पळण्याचा प्रयत्न करत आहे परंतू तेवढ्यात एक माकड त्याच्यावर पाठीवर उडी मारतो. काही वेळानंतर माकडांची टोळी तिथून निघून जाते.

व्हायरल व्हिडिओ एक्स(ट्वीटर) अॅपवरील @gharkekalesh'घर के कलेश' या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये सर्व घटना कैद केली आहे. या आधीही प्राण्यांचे माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

व्हिडिओ प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्म व्हायरल होत असून हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी तर अनेक भन्नाट कमेंटस् केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,'माकड्यांचा कलेश सुद्धा आज पाहिला' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे,माकड कोण आणि माणूस कोण हे मला समजत नाही'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com