
Kokan Viral Video: सोशल मीडियावर मीडियावर कायम अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. अनेकदा घडलेले अपघात हे व्यक्तींच्या अति निष्काळजीपणामुळे घडून येतात तर अपघाताच्या घटना व्यक्तींचा अति शहानपणामुळेही घडतात, त्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतात, त्यात सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात समुद्राचा आनंद लुटायला गेले असता
उशीर झाल्याने अजस्त्र लाटांमध्ये एक जोडप अडकलं होतं.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक समुद्र किनारा दिसत आहे. समुद्राच्या लाटाचा वेग अतिशय जोरदार आहे, मात्र या समुद्र किनारी एक जोडप तुम्हाला अडकलेले दिसत आहे. ते लाटांपासून वाचण्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करताना दिसतील, संपूर्ण व्हिडिओ एका पर्यटकाने काही अंतरावरुन मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच शेअर होत असून तो व्हिडिओ ''primetimemaharashtra'' यांच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''कोकणात समुद्राचा आनंद लुटायला गेले असता
उशीर झाल्याने अजस्त्र लाटांमध्ये अडकलं कपल'',असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्सही मिळाले असून बऱ्याच प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काय गरज होती'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' असे अडकतात ही लोकं''.
टीप : सध्या व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला जात आहे .व्हायरल व्हिडिओची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.