Lion Viral Video: मस्ती अंगाशी आली! ३ सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाची एन्ट्री; पुढे जे घडलं ते भयंकरच

Viral Video Of Lion: सिंह हा जगातील सर्वात बलाढ्य प्राण्यांपैकी एक आहे. सिंहाला लांबून पाहायलादेखील अनेकजण घाबरतात. परंतु जर एखादा व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्यात अडकला तर? असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lion Video
Lion VideoSaam Tv

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी रायडर्स बाइक एका टायरवर चालवतात तर कधी कोणी बलाढ्य प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु तुम्ही कधी कोणाला सिंहासोबत अडकलेले पाहिले आहे का? परंतु असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सिंह हा सर्वात जास्त बलाढ्य प्राणी म्हणून ओळखला जातो. सिंहाला लांबून पाहतानादेखील अनेकजण घाबरतात. परंतु याच सिंहासोबत जर कोणी पिंजऱ्यात अडकलं तर. विचारही करता येत नाही. परंतु एक व्यक्ती खरच सिंहासोबत एका पिंजऱ्यात अडकला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक मुलगा पिंजऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. या पिंजऱ्यात १ नव्हे तर ३ सिंह बसलेले दिसत आहे. हे तिन्ही सिंह एकापाठोपाळ त्या मुलाच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. हा मुलगा खूप जास्त घाबरलेला दिसत आहे. जेव्हा सिंह त्या मुलाच्या अंगावर धावून जातो तेव्हा हा मुलगा त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा मुलगा तिन्ही सिंहाना हाताने लांब करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Lion Video
Drunk Youths Video: दारुची मस्ती! भररस्त्यात कपडे काढले; गाडीवर चढून तरुणांचा भररस्त्यात राडा, संतापजनक VIDEO

@enamul___hoqe या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओवर २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. 'या मुलाचा जीव वाचला आहे की नाही?' , 'हा मुलगा पिंजऱ्यात अडकलाच कसा?', 'स्वतः ला संकटात कसं टाकायचं हे या मुलाकडून शिका', अशा कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Lion Video
Gold Silver Panipuri : श्रीमंतीचा शाही थाट; सोन्या-चांदीची पाणीपुरी खाल्लीय का? VIDEO होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com