

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आश्चर्याचा धक्का देतात तर कधी पोटधरुन हसायला लावतात. सध्या एका शेतकरी तरुणाच्या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले आहे. ऑडिमधून भाजी विकायला येणाऱ्या या तरुणाचा स्वॅग पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ऑडी चायवाला नावाच्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा तरुण चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो तो चक्क ३ कोटींच्या ऑडीमधून चहा विकत होता. सध्या असाच आणखी एक तरुण त्याच्या हटके स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
हा तरुण चक्क आलिशान ऑडीमधून भाजी विकायला येतो. त्याच्या या हटके स्वॅगची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा तरुण केरळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सुरूवातीला हा तरुण त्याच्या शेतातील भाजी काढताना दिसत आहे. शेतातील पालकची भाजी काढून तो त्याची मोळी बांधून चक्क ऑडीमध्ये ठेवतो आणि विकायला जातो. बाजारात जाऊन हा तरुण प्लॅटिक टाकून रस्त्याच्या कडेला भाजी विकत असल्याचे दिसत आहे.
तरुणाच्या या हटके स्टाईलवर नेटकरी चांगलेच फिदा झाले आहेत. व्हिडिओवर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून शेतकऱ्याचा नादच खुळा.. असे म्हणत तरुणाचे कौतुक केले आहे. आत्तापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
हा तरुण आहे कोण?
व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑडीने येणारा तरुण आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला. हा व्हिडिओ युवा आयकॉन पुरस्कार विजेता, शेतकरी आणि यूट्युबर सुजीतचा (Sujit) आहे. सुजीत हा तरुण शेतकरी असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी तो ओळखला जातो. कृषी क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासून काम करणाऱ्या सुजीतला राज्य सरकारकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच तो शेतीबद्दलचे त्याचे व्हिडिओही शेअर करत असतो. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.