

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एक हौशी तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला बाईकची स्टंटबाजी चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) सध्या तरुणांच्या बाईक स्टंटचे (Bike Stunt Viral Video) अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करतानाचे व्हिडिओ अनेकदा लक्ष वेधतात. अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
व्हिडिओमध्ये एका तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे. हा तरुण वर्दळीच्या ठिकाणी त्याच्या गाडीवर स्टंट करत लक्ष वेधून घेत आहे. मात्र हे करत असतानाच अचानक त्याचा तोल जावून तो गाडीवरुन जोरात पडतो. धक्कादायक म्हणजे तरुणाची गाडी थेट उडून दुसऱ्या वाहनांवर जाऊन आदळते.
व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असतानाच तरुण गाडीवर उभा राहून स्टंट करताना दिसत आहे. स्टंटसाठी हा तरुण गाडीच्या सीटवर उभा राहून वेगात गाडी पळवत आहे. मात्र अचानक त्याचा तोल जातो आणि भीषण अपघात होतो.
तोल गेल्यानंतर भरधाव वेगातील गाडीवरुन तो थेट रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे. तसेच त्याची गाडी दुसऱ्या वाहनांवर आदळल्याने दुसरा दुचाकस्वारही जखमी होतो. स्टंट करणारा तरुण ज्या पद्धतीने गाडीवरुन पडला, त्यावरुन त्याला गंभीर इजा झाल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा मुर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काही जणांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचे वाहन परवानेच रद्द करायला हवेत.. असाही सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.