Punjab 3 Sisters: एकाच पेटीत आढळला ३ बहिणींचा मृतदेह; धक्कादायक घटनेनं पंजाब हादरलं

Three Sister Dies: पोटच्या तिन्ही मुली एकाचवेळी दगावल्याने आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
Punjab 3 Sisters
Punjab 3 SistersSaam TV
Published On

Panjab News:

पंजाबमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एकाच घरातील तीन लहान बहिणींचा मृत्यू झालाय. पोटच्या तिन्ही मुली एकाचवेळी दगावल्याने आईवडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. घटनेमुळे परिसरातही भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Latest Marathi News)

Punjab 3 Sisters
Pune Crime News: बारा दिवसात २० लाखांचे ५ कोटी; पाण्याच्या टाकीत पैसे टाकायांचे सांगून फसवणूक

एकाच पेटीत तिघींचा मृतदेह

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पठाणकोट हायवेवरील कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. तिन्ही महिलांचे फोटो एकाच पेटीत सापडलेत. अमृता कुमारी (वयवर्षे ९), शक्ती कुमारी (वय ७) आणि कांचन कुमारी (वय ४) अशी या चिमुकलींची नावे आहेत. तिन्ही बहिणींचा एकाचवेळी जीव गेलाय.

या तिन्ही मुलींचे आईवडील नोकरी करतात. त्यामुळे ते दिवसभर घराबाहेर असतात. दोन दिवसांपूर्वी रात्री घरी आल्यावर मुली घरात नसल्याचे त्यांना समजले. शेजारच्या व्यक्तींकडे विचारपूस केली असता मुली कुठे आहेत हे कुणालाही माहिती नव्हते. त्यामुळे शेजारी आणि मुलींचे आई बाबा त्यांना शोधू लागले.

रात्रभर मुलींचा शोध घेऊनही त्यांचा काहीच शोध लागला नाही. त्यामुळे मुलीच्या आईवडीलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी झपाट्याने तपास कार्यास सुरूवात केली.

तक्रार दाखल करून घरी आल्यावर मुलींच्या घरासमोर असलेल्या एका ट्रंकवर शेजारच्या व्यक्तीची नजर पडली. त्याने सहज ती पेटी उघडली. यावेळी पेटीत तिन्ही मुलींचे मृतदेह होते. मुलींना पाहून आईवडील आणि शेजारच्या व्यक्तींच्या पायाखालची जमीनचं सरकली.

शेजारच्या व्यक्तींनी मुलींच्या वडिलांवर त्यांच्या मृत्यूचा संशय व्यक्त केलाय. मुलींचा पिता सतत दारूच्या नशेत असतो, त्यामुळे त्यानेच मुलींची हत्या केली असावी असा संशय शेजारच्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी देखील आपला तपास सुरू केलाय. मात्र वडिलांनीच त्यांची हत्या केली असावी असा कोणताही पुरावा मिळत नाहीये.

मुलींच्या अंगावर कुठल्याही जखमा नाहीयेत. त्यामुळे त्या खेळता खेळता पेटीत लपल्या असतील, त्यानंतर पेटीचे दार चुकून बंद झाले असेल. दार बंद झाल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Punjab 3 Sisters
Uttar Pradesh Crime: माजी जिल्हा पंचायत समिती सदस्याच्या हत्येचा बदला; जमिनीच्या वादावरून संपवलं अख्खं कुटंब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com