बेळगाव जिल्ह्यातील तरुण गेली १० वर्षे फक्त झाडांचा पाला खात आहे.
लग्नाच्या तगाद्यामुळे त्याने घर सोडून डोंगरावर आश्रय घेतला.
वानरांना पाहून त्याने पाला खाण्याची सवय लावून घेतली.
‘आधुनिक टार्जन’ म्हणून तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रणजित माजगावकर, कोल्हापूर
जसं जसे जग बदलत गेले, तस तसे बदलत्या राहणीमानाचा स्विकार करत माणूस शिकत गेला, बदलत गेला. शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींनी माणूस परीपक्व होत गेला. अंगाला पानं गुंडाळणारा माणूस आता टापटीप कपडे घालतो, तर जेवणात झाडाचा पाला आणि पाणी पिऊन जगणारा माणूस आता शिजवलेलं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण जेवतो. मात्र २०व्या शतकात एका तरुणाने पूर्वीचे जुने दिवस जगायला सुरुवात केली आहे. त्याला सध्या 'आधुनिक टार्जन' असे संबोधले जात आहे. कोण आहे हा टार्जन? काय आहे नेमका प्रकार? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.
बेळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने गेल्या दहा वर्षांपासून अन्नाचा त्याग करून केवळ झाडांचा पाला खाऊन जगण्याचा विस्मयकारक मार्ग स्वीकारला आहे. डोंगरावर राहून प्राण्यांप्रमाणे जीवन जगणाऱ्या या 'आधुनिक टार्जन'ची ही जीवनशैली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
सौदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावातील बुडन खान होसमनी (३४) या तरुणाने वैद्यकीय विश्वापुढे मोठे कोडे उभे केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याने अन्नाकडे पाठ फिरवली असून, तो केवळ झाडांचा पाला खाऊन जगत आहे. गावाबाहेरील हेग्गोळ नावाच्या डोंगराळ भागात तो एकांतात राहतो. झाडांचा पाला खाऊनही त्याची प्रकृती उत्तम असल्याने स्थानिक नागरिक त्याला 'आधुनिक टार्जन' म्हणून ओळखतात.
दहा वर्षांपूर्वी लग्नासाठी घरच्यांनी तगादा लावल्याने बुडन खानने घर सोडून डोंगराचा आश्रय घेतला होता. तेथे वानरांना झाडांचा पाला खाताना पाहून त्यानेही हीच सवय लावून घेतली. दररोज सकाळी झाडांचा पाला खाल्ल्यानंतर त्याचे पचन व्हावे म्हणून तो कठीण योगासने करतो. भूक लागली की वानरांप्रमाणे झाडावर चढून पाला खाणाऱ्या बुडन खानचे हे अजब वागणे सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.