सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्टींची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर टाकलेले प्रत्येक फोटो आणि व्हीडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असतात. सोशल मीडियाने तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यासाठी आजची तरुण पीढी काहीही करायला तयार असते. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची जोरदार चर्चा होत आहे. या तरुणाने चक्क मधमाशांचं पोळं खाल्लं. यावेळी मधमाश्यांनी चावून चावून त्याची वाईट अवस्था केली.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा तरुणाचा हा व्हिडीओ सर्वांच्या एक पाऊल पुढे निघाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका तरुणाने चक्क मधमाश्यांशीच पंगा घेतला आहे. मधमाशांचं पोळं तोडून हा तरुण मधमाशांसकट पोळ्यातील मध खाताना दिसत आहे. यावेळी मधमाश्यांनी चावून चावून या तरुणाची वाईट अवस्था केली आहे तरी देखील तो मध खाणं काही थांबवत नसल्याचे दिसत आहे.
जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट खायची असेल आणि त्यासाठी कितीही नुकसान झाले तरी त्याला काहीच फरक पडत नाही याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून येत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण आपल्या मित्रासोबत मध खाताना दिसत आहे. तो मधाने भरलेले मधमाश्यांचे पोळंच तोडतो. त्यामुळे मधमाशा या दोन्ही तरुणांवर हल्ला करतात. मधमाशांनी अक्षरश: हा तरुण आणि त्याच्या मित्राच्या तोंडाला, ओठाला, डोळ्याला आणि कपाळाला चावल्याचे दिसत आहे. मधमाश्यांनी चावून चावून त्यांची वाईट अवस्था केली आहे. असे असताना देखील या तरुणांनी मध खाणं काही सोडले नाही.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मधमाशा या दोन्ही तरुणांना चावत आहेत. मधमाशा चावल्यामुळे तरुणाचा चेहरा सूजला आहे. तरी तो मध खाण्यामध्येच दंग आहे. हा व्हिडीओ babamankawarombo नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स आश्चर्यचकीत झाले आहेत. ऐवढा त्रास होत असताना देखील हा तरुण मध खाणे सोडत नसल्याने नेटिझन्स चकीत झाले आहे. या तरुणाचा हा वेडेपणा आहे अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्स करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.