Ghost In Office: अंधाऱ्या रात्रीत ऑफिसमध्ये भूतांचा खेळ; थरारक दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

Office Ghost Viral Video: सोशल मीडियावर रात्रीच्यावेळी एका ऑफिसमधील विचित्र घटना समोर आल्या आहेत.
Ghost In Office:
Ghost In Office:Saam TV
Published On

Paranormal Activity In Office:

भूतबाधा, जादुटोणा अशा गोष्टींवर आजकालची पिढी विश्वास ठेवत नाही. भूतांचं अस्तित्व आहे की, नाही हे सांगणं कठीण आहे. खरं काय खोटं काय यावर कोणीही ठाम मत देऊ शकत नाही. मात्र सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

Ghost In Office:
Viral Video : 'बीड़ी जलाई ले दिल्ली मेट्रो मा'; काकांनी धावत्या मेट्रोत पेटवली बिडी अन्...

प्रत्येक जण ऑफिसमध्ये मेहनतीने काम करतात. काम करताना काही जण आपल्या डेस्कवर कोणत्याही एका देवाची मुर्ती ठेवतात. अशात ऑफिसमध्ये काही भूतांच्या गोष्टी किंवा किस्से अनेकांनी ऐकले असतील. तुम्ही नसताना रात्रीच्या अंधारात ऑफिसमध्ये काय घडत असेल असा विचार तुमच्याही मनात कधीना कधी आला असेल. सोशल मीडियावर रात्रीच्यावेळी एका ऑफिसमधील विचित्र घटना समोर आल्या आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ऑफिसमध्ये नाइट शिफ्टसाठी कोणीही नाही. अशावेळी ऑफिसमध्ये काही हलचाली घडतात. ऑफिसमध्ये अचानक कुणीतरी दरवाजा उघडतं. अचानक दरवाजा बंद होतो, दरवाजा उघडतो. कुणीतरी ड्रॉवर उघडतं. त्यातील महत्वाची कागदपत्रे खाली पडतात. लाईट्स बंद चालू होतात.

तसेच कँप्यूटर देखील अचानक सुरू होतात. आता हे सर्व होत असताना तिथे कोणीही नाही. हे काम कोण करतंय तेही माहिती नाही. कोणतीतरी अदृश्य शक्ती हे सर्व करत असल्याचं म्हटलं जातंय.

ऑफिसमध्ये माणूस नसताना अशा घटना घडत आहेत. या घटनांमुळे कर्मचारी भयभीत झालेत. ब्रिटनमधील एका ऑफिसमधील ही घटना असल्याचं समजलं आहे @Power_of_Xanadu या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Ghost In Office:
Vaibhav Tatwawadi Birthday: वैभव तत्ववादीच्या वाढदिवसाला मित्रांचा धिंगाणा; Video व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com