Viral Video: बापरे...! डंपरखाली येता येता दुचाकीस्वार वाचला; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे दुचाकीस्वार त्या अपघातात थोडक्याच बचावला आहे.
Shocking Video
Viral VideoSaam Tv
Published On

एकीकडे सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असताना राज्यात अनेक अपघाताच्या घटना घडल्या. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले. सध्या अशातच एका अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती ट्रकच्या खाली येण्यापासून थोडक्यात बचावला गेला आहे. सध्या या हे सीसीटीव्ही फुटेज सर्व मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक वाहन (Vehicle) अपघाताच्या घडना घडत असतात. वाहन चालवताना कायम चालकांचा निष्काळजीपणा (Carelessness) त्यांच्या मृत्यूचे कारण ठरतो. हे आपण अनेक व्हायरल (Viral) व्हिडिओमधून पाहतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नक्की अपघात कोणाच्या चूकीमुळे झालेला आहे ते पाहूयात.

काय घडले?

व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, संपूर्ण रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरु आहे. एका बाजूला सिग्नल लागल्याने वाहनांची रांग लागलेली आहे. मात्र ज्या बाजूला रिकामा रस्ता आहे, तेथून दोन ट्रक एकावेळी जाताना दिसत आहे. मात्र जसा दुसरा ट्रक तेथून जातो त्याच वेळी ट्रकच्या खाली एक दुचारीस्वार येतो. मात्र मात्र फक्त नशिब चांगले असल्याने तो दुचारीपासून लांब पडतो आणि दुचाकीचा संपूर्ण चूराडा होतो. सर्व घटना रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर'' @gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या अगांचा थरकाप उडलेला आहे शिवाय अनेक आश्चर्यचकित प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' भावाचे नशिब चांगल होते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''समजले नाही नक्की चूक कोणाची'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अशा घटना सासत्याने घडत आहेत''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Viral Catch Video : हे सुधारणार नाहीत! सर्याच्या कॅचची कॉपी करायला गेला अन् षटकार देऊन बसला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com