Suryakumar Yadav Catch: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन वनडे कप २०२४ स्पर्धा सुरु आहे. १२ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पाकिस्तान संघातील स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत ५ संघ जेतेपदासाठी मैदानात उतरले आहे. दरम्यान या स्पर्धेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात एक क्षेत्ररक्षक सूर्यकुमार यादव स्टाईल कॅच पकडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.
भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये बाऊंड्री लाईनवर पकडलेला तो डेव्हिड मिलरचा कॅच कोणीच विसरु शकणार नाही. हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटलाच होता. मात्र शेवटच्या षटकात सूर्याने बाऊंड्री लाईनवर मिलरचा कॅच पकडला आणि सामना भारतीय संघाच्या बाजूने फिरला. जर ही कॅच सुटली असती, तर भारतीय संघाचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वंप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहिलं असतं.
चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूने बाऊंड्री लाईनजवळचा सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काही जमलं नाही. कॅच तर सुटलाच, वरुन तोंडावर पडावं लागलं ते वेगळं. जो चेंडू मैदानाच्या आत होता, तो चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर फेकला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर झाले असे की, पाकिस्तानातील चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेत पँथर्स आणि डॉल्फिन हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फिरकी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर फलंदाजाने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जणारच नव्हता. त्यावेळी सीमारेषेवर असलेल्या क्षेत्ररक्षकाने सूर्यकुमार यादवची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कॅचच्या ऐवजी फलंदाजाला ६ धावा गिफ्ट म्हणून मिळाल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.