भारताच्या पोर्टचा इराणवर हल्ल्यासाठी वापर? अमेरिकन नौदलाकडून भारतीय बंदरांचा वापर?

Fact Check: आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्य समोर आणतो...आता भारताच्या पोर्टचा इराणवर हल्ल्यासाठी वापर केल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे खळबळ उडालीय...पण, खरंच अमेरिकेला भारताने हल्ल्यासाठी पोर्ट दिलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं पाहुयात...
Viral social media claims alleged that the US Navy used Indian ports to launch an attack on Iran, but the Indian government has officially denied the reports.
Viral social media claims alleged that the US Navy used Indian ports to launch an attack on Iran, but the Indian government has officially denied the reports.Saam Tv
Published On

...आता युद्ध पेटलं असून, भारताच्या पोर्टवरून अमेरिका इराणवर हल्ला करत असल्याचा दावा केला जातोय...इराणविरोधात भारताने पाऊल उचललं असून, अमेरिकेला मदत करत असल्याचा दावा केल्याने खळबळ उडालीय...कारण, ज्या देशात अमेरिकेचे बेस आहेत तिथे इराण हल्ले करतोय...त्यामुळे हा दावा खरा असल्यास भारतासाठीही धोका आहे...पण, खरंच अमेरिकेसाठी भारताने पोर्ट उपलब्ध करून दिलाय का...? याचीच पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

अमेरिकन नौदलाकडून भारतीय बंदरे वापरली जात आहेत.अमेरिकेतील ओएएन या वाहिनीवर हा दावा केलाय. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलंय...अमेरिकेनं भारताच्या पोर्टचा वापर करून श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ अमेरिकेनं इराणच्या जहाजावर हल्ला केल्याचा दावा केलाय...यात 80 जणांचा मृत्यू झालाय...पण, खरंच भारताने इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेला पोर्ट दिलंय का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...याबाबत काही मॅकझिन्स, पेपर, अमेरिकन न्यूजमध्ये अजून काही दावा केलाय का हे तपासून पाहिलं...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

अमेरिकेला भारताने पोर्ट वापरण्यास दिलेलं नाही

अमेरिकन नौदल भारतीय बंदरांचा वापर करत नाही

अमेरिकास्थित चॅनेल ओएएनवर केलेले दावे निराधार

अमेरिकेनं भारताच्या पोस्टवरून इराणवर हल्ला केलेला नाही

खोट्या बातम्यांपासून सावध रहा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन वृत्तवाहिनी वन अमेरिका न्यूजच्या या दाव्यांचे खंडन केलंय...मंत्रालयाच्या अधिकृत हॅन्डलवरही ही माहिती दिलीय...त्यामुळे इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं भारताच्या पोर्टचा वापर केल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com