Woman Thrown Off The Roo
Shocking VideoSaam Tv

भयंकर! १० लाखांच्या हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोला छतावरून फेकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ

Woman Thrown Off The Roof: सोशल मीडियावर काही दिवसांपासून एका महिलेच्या संबंधित घडलेल्या गुन्ह्याची चर्चा सर्वत्र होत आहे. ज्यामध्ये एका पतीने त्याच्या पत्नीला १० लाख रुपयांच्या हुंड्यामुळे घराच्या छतावरुन खाली फेकले आहे.
Published on

Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ दहा लाख रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी एका महिलेला तिच्या पतीनेच जीवघेणा हल्ला केला. घराच्या छतावरुन पत्नीला खाली फेकल्याचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक (Shocking) घटना जालौनमधील एका गृहनिर्माण संकुलात घडली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना, काही महिन्यांनंतर पतीने त्याच्या कुटुंबीयांनी प्रीतीकडे दहा लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला होता.

धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद

सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, एक महिला रस्त्यावर असलेल्या वाहनांवर जोरदार कोसळली जाते. त्यानंतर घटना पाहिल्यानंतर सर्वांची गर्दी महिलेच्या मदतीसाठी झालेली असते. या घटनेत महिलेच्या शरीराला गंभीर दुखापत झालेली आहे.

सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ(Video) प्रत्येक समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यातही तो इन्स्टाग्राम, एक्स(ट्वीटर) आणि फेसबूक अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर जास्त संख्येने पाहिला जात असून त्यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाह,''कधी अशा घटना थांबतील'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुपच भयानक घटना आहे'' तर काहींनी म्हटलं की,''पतीविरोद्धात कठोर कारवाई झाली पाहिजे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Woman Thrown Off The Roo
लफडेबाज नवरा गर्लफ्रेंडसोबत रूममध्ये, बायकोनं रंगेहात पकडलं, दृश्य पाहून हादरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com