DTC Bus VIDEO: दिल्लीच्या रोडवर ब्रेक फेल बसचा थरार; पार्क केलेल्या तब्बल १२ दुचाकींचा केला चुराडा, तरुणाचा जागीच मृत्यू

Bus VIDEO: ब्रेक फेल झालेल्या डीटीसी बसने पार्क केलेल्या धडक दिली असून यात एका तरुणाचा मृत्यू झालाय.
Delhi Bus
Delhi Bus Saam Twitter
Published On

Delhi DTC Bus VIDEO:

दिल्लीतील रोहिणी भागात डीटीसी बसने तब्बल १२ वाहनांना धडक दिल्याची घटना घडलीय. या अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी बस चालकाला अटक केलीय. (Latest News)

बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना दिल्लीतील रोहिणी भागातील अवंतिका येथील विश्राम चौकाजवळ दुपारी २.४५ च्या सुमारास घडली. येथील रोडवरून भरधाव वेगाने जाणारी डीटीसी बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी बसने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना धडकली आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातामुळे रस्त्याने जाणारे नागरिक आणि उभे असलेले नागरिक सैरवैर पळू लागले. बसची धडक लागू नये म्हणून लोकं पळू लागले. डीटीसी इलेक्ट्रिक बसचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. दुसर्‍या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, ताबा सुटलेली बसही सायकल आणि दुचाकींना धडक देत आहेत. एका वृत्तानुसार, बसने जवळपास १२ दुचाकींना धडकल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान मागील महिन्यातही अशीच घटना घडली होती. गेल्या महिन्यात पूर्व दिल्लीत डीटीसी बसने दोन ई-रिक्षा आणि एका फळ विक्रेत्याला धडक दिली होती. यामुळे एका 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. परंतु पोलिसांनी त्याला नंतर पकडलं होतं.

Delhi Bus
Woman Argument the students Viral Video: धावत्या बसला लटकून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिलेनं घडवली अद्दल, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com