सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी भररस्त्यात असो वा ट्रेनमध्ये, बसमध्ये, भांडणाचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात झालेली घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते. अशातच चेन्नईतील एका धाकड महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेमक काय खास आहे? या व्हायरल व्हिडिओत ते पाहूयात.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाहनांची वर्दळ आणि लोकांची गर्दी दिसते. महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसच्या पायऱ्यांवर लटकून काही विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहेत. हे बघून रस्त्यावरील लोक किंवा बसमधील एकही व्यक्ती त्या मुलांना लटकून प्रवास करण्याबाबत बोलताना दिसत नाही.
मात्र काही वेळानंतर हा सर्व प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनास आला. यानंतर महिलेने ती बस थांबवली. मग तिने पायऱ्यांवर लटकून प्रवास करणाऱ्या विद्यार्थांना जोरदार खडसावले. यावरच ती थांबली नाही तर, तिने त्या मुलांना मारहाणही केली. तसेच बसचालकाशी वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ हा एका व्यक्तीने आपल्या @surbalutwt या एक्स अंकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडिओ हा चेन्नईतील कुनराधुरमधील आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ बसमधील एका प्रवाशाने आपल्याजवळील मोबाईलमध्ये कैद केला आहे. ही महिला चेन्नईतील चित्रपट अभिनेत्री रंजना नाचियार आणि भाजप नेत्या आहेत, असे सांगितले जाते.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजर्सने लिहिले आहे की, 'तिने असे केल्याबद्दल तिचे खूप कौतुक. जर त्या मुलांच्या पालकांनी हे बघितले असते तर त्यांनी सुद्धा असेच केले असते' तर आणखी एकाने लिहिले की,' या महिलेला सलाम...चांगली अद्दल घडवली. प्रत्येक बस स्टॉपवर अशा प्रकारची पॉवरफुल महिला हवी.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.