Dance Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: 'भाऊ मन्हा सम्राट' गाण्यावर काकांचा अफलातून डान्स; पाहा VIDEO

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका काकांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात व्हिडिओत काकांनी मराठी गाण्यावर धम्माकेदार डान्स केलेला आहे.
Published on

Uncle Dance Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग यामधील जास्तीत व्हिडिओ रिल्सचे असतात तर कधी थरारक अपघाताचे व्हिडिओ असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एका काकांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काकांनी अफलातून डान्स केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक काकांनी एक नारंगी रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे आणि धोती घातलेली आहे. काही वेळात काका डान्स करण्यास सुरुवात करतात. ज्यात काकांनी 'भाऊ मन्हा सम्राट' या गाण्यावर ठेका धरला आहे. जो व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाता पाहण्यात आलेला असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

काकांचा डान्स व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''gulbyachi.comedy'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''लाव कि कडक'' असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही दिवसातच व्हिडिओला ३४ हजारांपेक्षा अधिचे लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या घराच व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नवरदेव फरार झाला आहे कोणाच आहे तेवढ घेऊन जावा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काही बोलू नकारे काकांना'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''भाऊ माझा डांबर'' अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Video
Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवला धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com