Fact Check: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीला तुकाराम मुंढेंचा पाठिंबा?

Tukaram Mundhe Viral Video Fact Check In Marathi: तुकाराम मुंढे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या CJP आंदोलकांना पाठिंबा दिल्याचा दावा व्हायरल होतोय. मात्र, या व्हिडिओमागचं सत्य काय? जाणून घ्या
TUKARAM MUNDHE VIRAL VIDEO FACT CHECK
TUKARAM MUNDHE VIRAL VIDEO FACT CHECKsaam tv
Published On: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहेत. निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण विरोधी पक्ष हा रस्त्यावर उतरला असून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर मागील काही दिवस दिल्लीमध्ये देखील इंडिया आघाडी आणि कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. अशातच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्यांनी आंदोलकांना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.

TUKARAM MUNDHE VIRAL VIDEO FACT CHECK
Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की, त्यामागचे सत्य तपासणे गरजेचे असते. सध्या एक्सवर @ragebait_krungi या अकाउंटवरून एक दावा केला जातोय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना IAS अधिकारी यांचा पाठिंबा असल्याचे या दाव्यात म्हटले जात आहे.

मात्र महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनायाच्या यांनी पडताळणीमध्ये हा दावा दिशाभूल करणारा आहे. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमात तरूणांशी संवाद साधताना दिसतात. यावेळी त्यांनी Gen Z ला उर्जेचा शक्तिसाली स्त्रोत असले संबोधले आहे.

TUKARAM MUNDHE VIRAL VIDEO FACT CHECK
Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

मात्र, या व्हिडिओचा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी आंदोलकांना पाठिंबा दिल्याचा दावा दिशाभूल करणारा ठरतो. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी त्यांची सत्यता तपासा. व्हिडिओचा संदर्भ समजून घ्या आणि खात्रीशीर माहितीच पुढे शेअर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com