Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

Viral Video Claims Free Liquor Bottle With Every Purchase: दारूची एक बाटली खरेदी केल्यावर दुसरी बाटली मोफत मिळतेय, असा व्हिडिओ व्हायरल होतोय. नोएडातील या व्हिडिओमागचं सत्य काय? जाणून घ्या साम टीव्हीच्या पडताळणीत.
Noida Liquor Shop Viral Video Fact Check
Noida Liquor Shop Viral Video Fact Checksaam tv
Published On: 

दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...या मेसेजमुळे दारूच्या दुकानाबाहेर गर्दी करण्यात आलीय...या व्हिडिओमध्ये एका दारूच्या दुकानासमोर लोकांची लांबच लांब रांग दिसत आहे. काही लोक खांद्यावर दारूचे बॉक्स घेऊन जातानाही दिसत आहेत. खरेदी केलेल्या प्रत्येक बाटलीसोबत दारूची एक बाटली मोफत दिली जातेय असा मेसेज आणि गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होतोय...यामुळे खरंच एका बाटलीवर फ्री दारूची बाटली मिळतेय का...? अशी चर्चा सुरू झालीय...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जातोय...ज्यात असा दावा केला जातोय की 'एक दारूची बॉटल खरेदी करा आणि एक बाटली मोफत मिळवा अशी ऑफर देत आहे... ज्यामुळे गर्दी होतेय...पण, खरंच अशी ऑफर सुरू आहे का...? ही ऑफर सगळीकडेच आहे का...? दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे...याचं आम्ही समर्थन करत नाही...मात्र, व्हायरल व्हिडिओमुळे याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झालीय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...आणि ही ऑफर नक्की कुठे सुरू आहे...? याची माहिती घेतली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

एका दारुच्या बाटलीवर एक बॉटल फ्री ही ऑफर जुनी

नोएडात काही दुकानांमध्ये ही ऑफर होती

मुदतीआधीचा स्टॉक संपवण्यासाठी ऑफर होती

सध्या एका बॉटलवर एक बॉटल फ्रीची ऑफर नाही

नोएडामध्ये काही दारुच्या दुकानांमध्ये मुदतीआधीचा दारूचा साठा संपवून टाकण्यासाठी अशा ऑफर्स दिल्या होत्या...त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे...मात्र, आता एका दारुच्या बॉटलवर दुसरी बॉटल फ्री मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com