'बायको सुंदर आहे' असे म्हणत मित्रांनी चिडवलं, नवऱ्याचा संताप उफाळला... थेट छतावर चढला! VIDEO VIRAL

Friends tease man saying wife is beautiful: सोशल मीडियावर सध्या एका विचित्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एक पती पत्नीच्या सौदर्यांला कंटाळून घरच्या छतावर जाऊन बसला आहे. या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
Friends tease man saying wife is beautiful
Viral VideoSaam Tv
Published On

Bareilly viral video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झालेत आणि एकाच वेळी हसून हैराणसुद्धा झाले आहेत. जी गोष्ट आहे एका नवऱ्याची, जो आपल्या मित्रांच्या छोट्याशा टोमण्यावर इतका संतापला की थेट छतावर चढला. कारण काय, तर फक्त एवढंच – "बायको सुंदर आहे!"

बायकोचं सौंदर्य नवऱ्याला पडलं महागात!

हो, हे ऐकून तुम्हालाही वाटेल की एवढ्या साध्या वाक्यावर कोणी इतकं संतापू शकतं का? पण हो, झालं तसंच. व्हायरल व्हिडिओमध्ये (Video) दिसते की एक व्यक्ती घराच्या उंच छतावर जाऊन बसलेला आहे. त्या व्यक्तीला पाहून परिसरातील सर्वजण घराच्या जवळ जमलेली आहेत. अनेकजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र,तो कोणाचेही ऐकत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

सध्या हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @SachinGuptaUP या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये घटनेचे कारण दिलेले आहे. कॅप्शनवरुन समजते की ही घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील आहे. एक्सवरच नाही तर इन्स्टाग्राम, फेसबून अशा प्रसिद्ध माध्यमांवरही ही घटना मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिली आहे.

ही घटना पाहून अनेक नागरिकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. त्यातील एका यूजरने म्हटलं,''खाली ये रे बाबा तुझी बायको चेटकीण आता बस्स का..'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''कशाला बायको गोरी केली'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Friends tease man saying wife is beautiful
क्रूरतेचा कळस! रागाच्या भरात पती बनला राक्षस; पत्नीला उंच इमारतीच्या रेलिंगवरून लटकवले; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com