
Husband Wife Drama Train: मुंबई लोकल सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. इथं रोज लाखो प्रवासी एकमेकांना सांभाळत पुढे जाण्याची धडपज करतात. मात्र, या धावपळीच्या प्रवासात अनेकदा काही क्षण घडतात, की डब्ब्यातील लोक डोक्याला हात मारतात किंवा एकमेंकाकडे पाहत हसतात.
सध्या मुंबई (Mumbai Local) लोकलमध्ये असाच एक प्रसंग घडला आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती रेल्वे रुळाच्या बाजूला अगदी धावत्या ट्रेनच्या बाजूला उभा आहे. ट्रेन आल्यानंतर तो व्यक्ती महिलांच्या डब्ब्यांजवळ जातो आणि त्या डब्ब्यात असलेल्या त्याच्या पत्नीला त्याच्याकडची बॅग देतो आणि स्वत:नंतर दुसऱ्या डब्ब्यात चढतो. व्यक्तीचा हा प्रताप लांबून एका प्रवासाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
हा व्हिडिओ (Video) काही तासांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर अनेक लोकांनी हा प्रसंग पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,'' शूटिंग करताना मला कधीच वाटलं नव्हतं की असं होईल'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मुंबईतील एका सामान्य रहिवाशाला दररोज ज्या परिस्थितीतून जावे लागते ते अत्यंत धोकादायक आणि दुःखद आहे'' शिवाय अनेकांनी व्यक्तीच्या अशा कृतीवर संताप व्यक्त केला आहे.
फक्त काही तासांत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज याला मिळालेले आहेत शिवाय हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील vaibhav_ki_mandali या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. इन्स्टाग्राम नाही तर फेसबूक आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.
टीप: लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.