Viral Video: शाळा आहे की कुस्तीचा आखाडा? शाळेतील मुख्याध्यापिका अन् शिक्षिकेची WWE स्टाईल भांडणं,व्हिडिओ व्हायरल

School Teacher Fighting Video: शिक्षक म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शक असतात. पण हेच शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर चुकीचे वागत असतील तर? सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
School Teacher Fighting Video
Viral VideoSaam Tv
Published On

Principal and Librarian Fighting: शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर असते, मात्र येथे शिक्षिका बनल्या भांडणाच्या नायिका. [शाळेचे नाव] या जिल्हा परिषद शाळेत महिला मुख्याध्यापक आणि महिला ग्रंथपाल यांच्यात अचानक तुफानी भांडण झाले. विद्यार्थ्यांसमोरच दोघींनी एकमेकींवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला, शिवीगाळ करत एकमेकींचे केस ओढले आणि धक्काबुक्की केली.

घडलेला हा प्रकार मध्य प्रदेशमधील असल्याचे समजते. मात्र, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्हिडिओला(VIDEO) सोशल मीडियावर लोकांनी मोठी पसंती मिळत आहे आणि अनेक प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे हा व्हिडिओ. पहिल्यांदा हा व्हिडिओ एक्सवरील @nitendrasharma2 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. काही तासांतच लाखों लोकांनी पाहिला असून मोठ्या संख्येने व्ह्यूजही मिळत आहे.

व्हिडिओत तुम्हाला शाळेचा परिसर दिसत असून सुरुवातीस दोन शिक्षिका काही कारणास्तव भांडण करत होत्या. सर्वांना वाटले हा वाद मिटेल, पण पाहता पाहता दोघींही एकमेंकीना मारण्यास सुरुवात करतात. हाणामारी(FIGHTING) इतक्या टोकाला जाऊन करतात की, दुसऱ्या शिक्षिका आल्यावर दोघीही थांबल्या. या घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापन समितीने तातडीने बैठक घेतली. प्राथमिक चौकशीनंतर दोघींना पदावरून दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पालकांसह विद्यार्थी वर्गातून तुफान प्रतिक्रिया

नेटिझन्सकडून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. एका यूजरने कमेंट केली,''आता शाळेत जाण बोर नाही तर भारी आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आमच्या वेळी असं का होत नव्हतं'' तर काही पालकांनी म्हटलं की,''कडक कारवाई करण्यात यावी'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

School Teacher Fighting Video
Fighting Viral Video: मुंबईत भररस्त्यात राडा! कार चालक अन् बस कंडक्टर भिडले, व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com