Viral Video: संधी आली की चोपलं! कॉलेजच्या कॅम्पसमध्ये महिला शिक्षक आणि विद्यार्थिनींचा जबरदस्त राडा

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षक वर्ग हादरुन गेले आहेत. नक्की काय घडले आणि कोणासोबत घडले ते समजण्यासाठी व्हायरल व्हिडिओ एकदा तुम्ही पाहाच.
Fighting Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Teacher Student Clash: सध्या एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये महिला शिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्यात झालेला जोरदार वाद चांगलाच गाजत आहे. सोशल मीडियावरही या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाद इतका वाढला की थेट हातघाई झाली आणि दोघी एकमेकांवर तुटून पडल्या.

कॉलेजच्या मैदानात धिंगाणा

या घटनेमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक विद्यार्थीनी एका महिला शिक्षिकेशी वाद(Fighting) घालत असते. अत्यंत रागात असलेली ही तरुणी शेवटपर्यंत काही थांबन नाही. धक्कादायक म्हणजे, चक्क विद्यार्थीनी आपल्या पायातील चप्पल काढते आणि समोर असलेल्या शिक्षिकेला मारते. पण काय त्यानंतर दोघींमध्ये तुफान राडा होतो. पण काही तरुणी यावर थांबत नाही तर पुन्हा एकदा शिक्षिकेला कानशिलात लगावते. संपूर्ण राड्याचा व्हिडिओ एका विद्यार्थीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ

कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण हा @gharkekalesh या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ही घटना त्या परिसरापूर्ती मर्यादित न राहता संपूर्ण देशात व्हायरल झालेली आहे. लाखोंचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडिओला पाहून प्रत्येकजण संतापलेले आहेत.

व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

या घटनेची कॉलेज प्रशासनाकडून चौकशी सुरु आहे. पण सोशल मीडियावर (Media)ही घटना पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आता शिक्षकांचा धाक राहिलेला नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''तरुणींवर चांगलीच कारवाई करावी'' शिवाय काही यूजर्संनी म्हटलं की,''शिक्षिकेने नक्कीच काही तरी केले असेल'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Fighting Viral Video
Viral Video: मेरठमध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायकांची भांडणं! झिंज्या धरल्या, ओढत नेलं; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com