Viral Video: क्षणात सगळं संपलं असतं! रेल्वे जवळ येत असतानाही महिलेचा क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न;पुढे जे घडले ते पाहाच!

Shocking Viral News: सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्याचा व्हिडिओ अतिशय भयानक आहे,ज्यात महिला रेल्वे रुळावरुन जात असते मात्र थोडक्यात तिचा जीव वाचला गेला आहे.
Shocking Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

Shocking Video: सिंग्नल असो वा रेल्वे क्रॉसिंग या सर्व गोष्टींना अनेकजण महत्त्व देत नाही.वेळ वाचवण्यासाठी रस्त्यावरील सिंग्नल आणि रेल्वे क्रॉसिंगचे नियम न पाळता पार करतात.बऱ्याचदा सिंग्नल आणि रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी अतिघाई केल्याने काहींनी जीव गमवावा लागतो.सध्याच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात महिलेने रेल्वे क्रॉसिंग बंद असताना ते पार केले मात्र जे झाले ते पाहून तुमचाही थरकाप उडेल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रेल्वे स्टेशनचा परिसर दिसून येत आहे.स्टेशनपासून काही अंतरावरुन एक ट्रेन येत असते.मात्र तरीही त्याच रेल्वे रुळावरुन अनेकजण पलिकडे ये-जा करत असतात.त्यात ट्रेन एका महिलेच्या जवळ येत असते तरीही ती स्वता:चा जीव धोक्यात घालून तेथून जात असते.शेवटला व्हिडिओत पाहिले तर अगदी काही क्षणाच्या अंतराने महिला ट्रेनच्या धडकेपासून बचावली जाते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या इन्स्टाग्रामवरील 'arup.bhattacharjee.731' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच तब्बल लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.मात्र काहींनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेट केली आहे,''पागल आहे का'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''देवा काय हे''तर अनेकांनीही अशा संतापजन प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral News
Shocking Viral Video : क्रिकेटच्या मैदानात खेळाडूचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, VIDEO आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com