Slipping on Railway track Viral Video: सोशल मीडियाचा नाद लय बेकार; रील व्हिडिओच्या नादात अख्खी रेल्वे अंगावरून गेली, पुढे काय घडलं?

Man Lays Under Track Viral Video:धावत्या ट्रेनखाली तो झोपला; रील व्हिडिओच्या नादात आख्खी रेल्वे अंगावरून गेली, पुढे काय घडलं?
Slipping on Ralway track Viral Video
Slipping on Ralway track Viral Video
Published On

Under Track Viral Video: आजची तरुण पिढी सोशल मीडियावर रील व्हिडिओ बनवण्यात व्यस्त झाली आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी तरुण कोणत्याही थराला जातात. या घटनेत आपला जीव जाईल याची त्यांना काहीच भीती नसते. आतापर्यंत मेट्रो ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत होते. अशात आता रेल्वे रुळांवर झोपल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. (Latest Viral Video)

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीतरी हटके केल्यावरच जास्त लाईक्स आणि व्ह्यूव्ज मिळतात. त्यामुळे रील व्हिडिओच्या नादात काही तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक तरुण थेट रेल्वे रुळांवर झोपलाय.

Slipping on Ralway track Viral Video
Viral Video: हौसेला मोल नाही! पुराच्या पाण्यात स्विमिंग पूलची मज्जा; लुंगी घातलेल्या पठ्ठ्याचा VIDEO पाहून पोटदुखेपर्यंत हसाल

रेल्वे रुळांखाली आल्यावर कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचणे अशक्य आहे. मात्र रुळांमध्ये असलेल्या रिकाम्या आणि खडी असलेल्या जागेत झोपल्यावर व्यक्ती वाचण्याची शक्यता असते. कारण खड्डा असल्यामुळे बारिक व्यक्ती तेथे सहज लपू शकते. त्यामुळे तुम्हाला कोणतीही दुखापत होत नाही.

आता या हुल्लडबाज तरुणाने देखील असाच काहीसा प्रताप केला आहे. त्याने आपल्या मित्राला व्हिडिओ काढायला सांगितली आहे आणि तो रेल्वे रुळांवर झोपलाय. रुळांच्यामध्ये असलेल्या जागेत तो झोपला आहे. रुळांमध्ये तो पूर्ण झोपला असून त्याने आपले हात मोठ्या स्टाईलमध्ये डोक्याखाली ठेवले आहेत. आपल्याला कसलीही भीती वाटत नाही, असं या मुलाला व्हिडिओमधून दाखवून द्यायचं आहे.

Slipping on Ralway track Viral Video
Rain Viral Video: पठ्ठ्यांनी कहरच केला! मुसळधार पाऊस अन् तरुणांनी बाईकवर केली अंघोळ; व्हिडिओ तुफान व्हायरल...

तरुणाच्या अंगावरुन संपूर्ण ट्रेनजाते आणि त्याचा रील व्हिडिओ (Reel Video) त्याला हवा तसा शूट होतो. अभिषेक नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अशा पद्धतीने व्हिडिओ बनवणे हे पूर्णत: चूकीचे आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे मला माहिती नाही. मात्र अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com