Viral Video: हौसेला मोल नाही! पुराच्या पाण्यात स्विमिंग पूलची मज्जा; लुंगी घातलेल्या पठ्ठ्याचा VIDEO पाहून पोटदुखेपर्यंत हसाल

Swimming In Flood Water: पुराच्या पाण्यात स्विमिंग पूलची मज्जा; लुंगी घालत थर्माकॉलव पठ्ठ्याची करामत, पाहा VIDEO
Viral Video
Viral VideoSaam tv
Published On

Gujrat Viral Video: राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचं दिसत आहे. मुंबईत नेहमीप्रमाणे यंदाही पावसाचे पाणी साचल्याने काही रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. काही भागांत गुढग्या इतके पाणी साचले. अशात सोशल मीडियावर या पाण्याला न घाबरता त्यात पोहणाऱ्या एका व्यक्ती व्हिडिओ व्हायरल झालाय.

व्हिडिओमध्ये तो व्यक्ती एका थर्माकॉलवर बसलाय. परिसरात सर्वत्र कंबरेइतकं पाणी साचलं आहे. या पाण्यात भीजत जाण्यापेक्षा काही तरी मार्ग काढला पाहिजे असं म्हणत या पठठ्याने एक मोठा थर्माकॉल आणला. हा थर्माकॉल त्याने पाण्यावर टाकला. पाण्यावर थर्माकॉल तरंगू लागल्यावर त्या व्यक्तीनेही यावर उडी घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण रस्ता थर्माकॉलवर बसून तो आरामात पार करत आहे.

Viral Video
Pune Station Viral Video: कसली निर्दयता! गाढ झोपलेले प्रवासी अन् पोलिसाने केले असे कृत्य.. पुणे स्टेशनवरील व्हिडिओवर संतापले नेटकरी

सदर व्हिडिओ हा गुजरातमधील आहे. गेल्या महिन्यात बिपरजॉय चक्रिवादळामुळे गुजरातमध्ये पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. वादळामुळे काही गावांना पूर आल्याने नागरिकांचा संपर्कही तुटला होता. अशा परिस्थितीला देखील हसत आणि इंन्जॉय करत हा व्यक्ती सामोर जात आहे. लुंगी नेसून आलेल्या या व्यक्तीने थर्माकॉलवर बसून आपसं घर गाठलंय.

थर्माकॉलवरचा त्याचा हा प्रवास काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. @zaitra या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ पोस्ट केल्यापासून याला लाखो व्ह्यूव्ज मिळालेत.

Viral Video
Viral Thieves Video : चोरांना पाहून मित्र पळत सुटला; एकाकी पडलेल्या तरुणीला बघून चोराचं हृदयही तुटलं, पुढे काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com