Viral Video : बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं...;काकूंचा हटके डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

Womens Dance Video Viral : बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं... या गाण्यावरील महिलांचा डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्यावर पाच जणांनी डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या महिलांचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
Viral Video
women video viral Saam tv
Published On

मुंबई : मॉर्डन काळात पारंपरिक आगरी कोळी गाण्यांची क्रेझ कायम आहे. सोशल मीडियाच्या काळातही लोकांचं पारंपरिक गाण्यावर प्रेम कायम आहे. लहान असो वा ज्येष्ठ... लोकांमध्ये आगरी कोळी गाण्यांची आवड कायम आहे. आगरी कोळी गाण्यावरील रिल्स देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असंच एक आगरी कोळी संस्कृतीचं गोडवा सांगणारं 'बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं...' हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. त्यावर आतांपर्यंत रिल्स तयार केले आहेत. त्यापैकी एक रिल्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video: वा रे माझ्या वाघा! ७ वर्षांच्या मुलानं एकदम गोल गोल भाकरी बनवली, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी

सोशल मीडियाच्या काळात लहान असो वा ज्येष्ठ सर्वांना रिल्स करण्याची आवड निर्माण झाली आहे. मागील काही वर्षात रिल्स तयार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रिल्स तयार करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. एखाद्या खेडागाव राहणारा व्यक्तीही लाखो व्ह्यूज मिळवून कमाई करू लागला आहे.

यामध्ये गावागावातील महिलाही मागे नाहीत. डान्सची आवड असणाऱ्या महिलाही अनेक महिला सोशल मीडियावर रिल्स तयार करताना दिसतात. त्यात 'बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं...' हे गाणं सध्या चांगलं चर्चेत आहे. अशीच डान्स आणि रिल्सची आवड असणाऱ्या महिलांचा 'बाया माझ्या बांगुऱ्या...' या गाण्यावरील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video: अर्रर्र! रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन् फजिती झाली, नेमकं काय झालं पाहा व्हिडीओ

'बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं...' या पाच जणांच्या महिलांच्या ग्रुपने हा डान्स केला आहे. या पाच जणांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे. या महिलांनी एका चाळीमध्ये केलेला हा डान्स चर्चेत आला आहे. यावेळी अनेक युजर्सनी चाळ संस्कृतीच्या एकोप्याचं कौतुक केलं. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा व्हिडिओ सत्तर हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओवर शेकडो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या डान्सचं कौतुक केलं आहे. तर दहा हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Viral Video
Viral Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर धिंगाणा; पुरुषाची स्टेशनवरच सायकलवर स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

एका युजरला हा व्हिडिओ प्रचंड भावला. त्याच युजरने म्हटलं की, 'हे फक्त चाळीमध्ये घडू शकतं. चाळीत राहण्याची वेगळीच मज्जा आहे. मी देखील मुंबईत चाळीत राहायचे. आता गेल्या १५ वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये राहत आहे. आजही मला चाळ संस्कृतीची आठवण येते. तो आनंद आणि ती मज्जा पुन्हा होणे नाही. तुम्ही अशीच मज्जा करत राहा. इमारती झाल्यावर मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मिळत नाही. मी आता न्यूझीलंडला असले तरी मनाने चाळ संस्कृतीत आहे'. तसेच यावेळी अनेकांनी डान्स करणाऱ्या काकूचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com