धक्कादायक! लोकल गर्दीचा छातीत धडकी भरवणारा आणखी एक व्हिडिओ; प्रवाशांचा जीव टांगणीला

Rush Hour Scene in Local Train: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रवाशांच्या तुफान गर्दीचा आहे. ज्यात नेमके काय घडते ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.
Mumbai Local Train Shocking Video
Rush Hour Scene in Local TrainSaam Tv
Published On

Mumbai Local Train Shocking Video: मुंबईची लोकल ही केवळ प्रवासाचं साधन नाही, तर ती लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र, हीच लोकल जेव्हा प्रचंड गर्दीने भरके तेव्हा ती जीवघेणीही ठरू शकते. असाच एक छातीत धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकल ट्रेनच्या दारातून स्टेशनवर उतरताना आणि ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची धापवळ, ढकलाढकली आणि जीव धोक्यात घालून चालणारा प्रवास दिसतो.

या व्हिडिओमध्ये एका स्टेशनवरील असून संध्याकाळच्या वेळीचे भयावह दृश्य कैद झालं आहे. ट्रेनमध्ये(Local Train) शिरत असतानाच तिच्या दारात अक्षरशः शेकडो लोक लटकलेले दिसतात. काही प्रवासी दरवाज्याच्या बाहेर एकचा वेळी येण्याचा आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. ही धावपळ इतकी भयंकर आहे की कुणाचाही तोल एकमेंकावर गेला असता किंवा खाली पडला असता जरी गेला असता तर मोठा अपघात घडू शकला असता.

मुंबई लोकलमधली गर्दी ही नवीन गोष्ट नाही, पण अलीकडच्या काळात गर्दीचं प्रमाण भयावह पातळीवर गेलं आहे. दरवाज्याच्या बाहेर लटकून प्रवास करणं ही आता अनेकांसाठी रोजची सवय झाली आहे. मात्र यामध्ये प्रचंड धोके आहेत तोल गेल्यास प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडू शकतो, प्राणही गमवू शकतो. अशा घटनांचा इतिहासही काही नवीन नाही. प्रत्येक वर्षी शेकडो प्रवासी अशा अपघातांमध्ये जखमी होतात किंवा मृत्यूमुखी पडतात.

या व्हिडिओ(Video) नक्की कोणत्या स्टेशनवरील आहे आणि कधीचा आहे ते अद्याप समजले नाही. काही ठिकाणी हा व्हिडिओ जानेवारी महिन्यातील असल्याचे सांगिलतले जात आहेत. ऐवढेच नाही तर हा प्रकार पाहिल्यानंतर नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही एका यूजरने म्हटलं,''दररोज असा प्रवास करताना जीव गोठतो'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,'' घरातून सकाळी निघालं की वाटतं आपण परत घरी येऊ की नाही,'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Mumbai Local Train Shocking Video
भयंकर! लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; रक्तबंबाळ होईपर्यंत एकमेकींना मारलं, व्हिडिओ बघून संताप होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com