Viral News : एक्स्प्रेस सुटली, लाइट गेली...; संतप्त प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये कोंडले

Suhaildev Express News : एक्सप्रेसमध्ये गैरसोय झाल्याने प्रवासी संतापले. त्यांनी टीसीला शौचालयातच कोंडले.
Suhaildev Express
Suhaildev ExpressSaam Tv
Published On: 

Suhaildev Express Video Viral : सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल सोडल्यानंतर एक्स्प्रेसमधील दोन डब्यांमधील वीज गेली. वीजेअभावी गैरसोय झाल्याने प्रवासी संतापले. त्यांनी टीसीला शौचालयातच कोंडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीटीआय वृत्तानुसार, आनंद विहार टर्मिनलहून सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस सुटल्यानंतर काही वेळातच बी १ आणि बी २ या डब्यांमधील वीज गुल झाली. एसीही बंद झाले. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतापले.

Suhaildev Express
Ajit Pawar On Pune Chandani Chowk Bridge: पुण्यातील चांदणी चौक नाव कसं पडलं?; अजित पवारांनी सांगितला इतिहास

संतप्त प्रवाशांनी याबाबतची तक्रार टीटीईकडे केली. तर काही प्रवाशांनी टीटीईलाच ट्रेनमधील शौचालयात कोंडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डब्यांमधील वीज गायब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला. टीटीईकडे तक्रार करताना प्रवासी व्हिडिओत दिसत आहेत. तर काही प्रवाशांनी टीटीईला शौचालयातच कोंडले. तर रेल्वेचे कर्मचारी वीज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतानाही व्हिडिओत दिसत आहेत.

एक्स्प्रेस टुंडला स्टेशनवर पोहोचल्यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. लवकरात लवकर वीज पूर्ववत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शौचालयात कोंडलेल्या टीटीईला बाहेर काढण्यात आले. काही वेळाने अभियंत्यांनी डब्यामधील वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com