Ajit Pawar On Pune Chandani Chowk Bridge: पुण्यातील चांदणी चौक नाव कसं पडलं?; अजित पवारांनी सांगितला इतिहास

Chandani Chowk Bridge History: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांदणी चौक नाव कसं पडलं याचा इतिहास सांगिताला आहे.
Ajit Pawar On Pune Chandani Chowk Bridge
Ajit Pawar On Pune Chandani Chowk BridgeSaam TV
Published On: 

Pune Chandani Chowk Flyover: गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलाचे रखडलेले काम अखेर पूर्ण झालंय. यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने पुणेकर खुश आहेत. सदर पुलाचा आज लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलाय. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांदणी चौक नाव कसं पडलं याचा इतिहास सांगिताला आहे. ( Latest Chandani Chowk Bridge Inauguration)

उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं की, "नॅश्नल डीफेंस अकॅडमीला जाणारा रस्ता आणि मुंबई-बेंगलोर हायवेसह अनेक महत्वाचे मार्ग चांदणी चौकातून जातात. पुण्यातील उपनगरं जशी वाढली त्याप्रमाणे चांदणी चौकाची वाहतूक देखील वाढली. त्यामुळे काही दिवसांत चांदणी चौक आणि वाहतुककोंडी यांचे एक समिकरणच तयार झाले."

Ajit Pawar On Pune Chandani Chowk Bridge
Pune Chandni Chowk: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, चांदणी चौक उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार

नावाचा इतिहास

"चांदणी चौकाचं नाव महापालिकेच्या नोंदणीत एनडीए चौक असं आहे. मात्र नागरिक सुरुवातीपासूनच या चौकाला चांदणी चौक म्हणून ओळखत आहेत. काही जुनी माणसं या पुलाबद्दल सांगतात की, आधीच्या जुन्या पुलावर एका दगडावर चांदणी कोरली गेली होती. त्यामुळे या पुलाला चांदणी चौक नाव पडलं.", असं अजित पवारांनी सांगितलं.

यावेळी बोलताना पुढे मिश्किल अंदाजात त्यांनी म्हटलं की, रस्तावर, पुलावर कधी कोणी चांदणी काढतं, कोणी हार्ट तर कोणी बाण काढतं मग त्याला काय नाव द्यावं, अजित पवारांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Ajit Pawar On Pune Chandani Chowk Bridge
Ajit Pawar In Metro Train: चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारांचा मेट्रोने प्रवास; पाहा VIDEO

पुणेकरांची पाटी जगात गाजलीये

पुणेकर नेहमीच सर्वांना नावं ठेवतात. त्यांच्या पाट्या जगात गाजल्या आहेत. पुण्यातील देवांची नावं देखील निवडूंग विठोबा, फुन्या मारुती, दाढीवाला दत्त ...अशी नावं पुणेकरांनी ठेवली आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं. यावेळी पुणेकरांच्या पाट्यांचं त्यांनी कौतुक केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com