Ajit Pawar In Metro Train: चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारांचा मेट्रोने प्रवास; पाहा VIDEO

Chandani Chowk Flyover: उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यंमंत्री अजित पवारांनी मेट्रो ट्रेनने प्रवास केलाय.
Ajit Pawar In Metro Train
Ajit Pawar In Metro TrainSaam TV
Published On: 

Pune Chandani Chowk Bridge: गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील चांदणी चौकाचे काम सुरू होते. हे काम अखेर आता पूर्ण झाले असून आज या रस्त्याचा उद्घाटन सोहळा आहे. या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यंमंत्री अजित पवारांनी मेट्रो ट्रेनने प्रवास केलाय. (Latest Chandani Chowk Bridge Inauguration)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रुबी हॉल ते वनाज कॉर्नरपर्यंत मेट्रोने प्रवास केला आहे. चांदणी चौकाच्या नव्या पुलाच्या उद्घाटनात लवकर पोहचण्यासाठी त्यांनी मेट्रोने प्रवास केलाय. प्रवासावेळी मेट्रोमध्ये गर्दी असल्याने त्यांनी काहीवेळ उभ्याने प्रवास केला. तसेच प्रवाशांसोबत गप्पाही मारल्या.

Ajit Pawar In Metro Train
Pune Metro: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, आजपासून ४ दिवस बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याआधी वंदे भारत एक्सप्रेसने देखील प्रवास केला होता. सध्या त्यांच्या मेट्रो ट्रेनमधील प्रवासाची चर्चा होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com