Snake In Cauliflower: बापरे बाप! फ्लॉवर भाजीत लपून बसला साप; व्हायरल VIDEO पाहून भाजी घेताना १०० वेळा विचार कराल

Snake In Cauliflower Viral Video: पालेभाज्या घेताना त्या व्यवस्थीत पाहून आणि स्वच्छ धुवून घ्याव्यात.
Snake In Cauliflower
Snake In CauliflowerSaam TV
Published On: 

Viral Video: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र निसर्गाची हरवी शाल पसरलेली असते. या दिवासांत पालेभाज्या घेताना त्या व्यवस्थीत पाहून आणि स्वच्छ धुवून घ्याव्यात. अनेक किटक भाज्यांवर येतात. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. अशात सोशल मीडियावर अंगावर शहारे आणणार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

फ्लॉवरमध्ये साप

एका व्यक्तीने फ्लॉवर भाजीसाठी विकत घेतलाय. घरी येऊन हा फ्लॉवर कापताना त्या व्यक्तीला यामध्ये काहीतरी असल्याचं जाणवलं. त्याने फ्लॉवरचा काही भाग उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला जे दिसलं त्याने त्याच्या काळजात धडकीच भरली. कारण फ्लॉवरमध्ये साप लपून बसला होता.

Snake In Cauliflower
Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, माजी नगरसेवकास अटक

जर या व्यक्तीचं फ्लॉवरकडे लक्ष गेलं नसतं तर साप बाहेर येऊन त्याचा चावा घेतला असता. मात्र या व्यक्तीचं वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. पुढे त्याने फ्लॉवर काही वेळ तसाच बाजूला ठेवला. साप स्वताहून बाहेर येईल असं त्याला वाटलं. मत्र साप काही बाहेर आलाच नाही.

त्यामुळे साप बाहेर काढण्यासाठी या व्यक्तीने हिंमत करत तो फ्लॉवर दोन्ही हातांनी आर्धा तोडला. फ्लॉवर तोडल्यावर त्यातून साप सळसळ करत बाहेर पडला. सापाचा हा व्हिडीओ त्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

@Viralbhaiya या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट्स केल्यात. व्हिडीओ शेअर करत या व्यक्तीने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. बाजारातून भाजी खरेदी केल्यावर ती व्यवस्थित पाहून घ्यावी असं त्याने यात म्हटलंय.

Snake In Cauliflower
Kalyan Crime News: कल्याण हादरलं! तरुणाकडून अल्पवयीन मुलीची सपासप वार करत हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.